– 29 जून पर्यंत अर्ज करता येणार
नागपूर :- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे व इंडो जर्मन टूल रुम (IGTR) 2024-25 यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर प्रशिक्षण केंद्राच्या 125 जागांसाठी मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या युवक-युवतीसाठी नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध प्रशिक्षणाकरिता 29 जून 2024 पर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत.
मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेअर गटाच्या युवक-युवतीसाठी पूर्णवेळ, अनिवासी, नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत 10 वी, आयटीआय, डिग्री डिप्लोमा, मेकॅनिकल, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, सिव्हील इंजिनिअर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या प्रशिक्षणासाठी छत्रपती संभाजी नगर, वाळूज, पुणे, नागपूर, कोल्हापूर अशा एकूण 851 जागा असून नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रासाठी 125 जागा उपलब्ध आहेत. ‘इंडो जर्मन टूल रुम’(IGTR) कौशल्य विकास प्रशिक्षणाविषयी विस्तृत माहिती सारथीच्या https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून जास्तीत जास्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी नागपूरचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.