मुंबई :- तांत्रिक सहकार्यासाठी भारतीय नौदल आणि भारतीय सागरी विद्यापीठ यांच्यात 02 जून 23 रोजी नवी दिल्ली येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या सामंजस्य करारामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स (मरीन इंजिनीअर), आयएनएस शिवाजी, लोणावळा आणि भारतीय सागरी विद्यापीठ यांच्या चमूद्वारे प्रशिक्षण, संयुक्त संशोधन आणि विकास, सहयोगी अभ्यासक्रम, क्षेत्रीय स्तरावरील समस्यांचे निराकरण या क्षेत्रातील सहकार्याची प्रक्रिया स्पष्ट केली आहे.
या सामंजस्य करारावर चीफ ऑफ मटेरियल व्हाईस ॲडमिरल संदीप नैथानी आणि भारतीय सागरी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मालिनी व्ही शंकर, आयएएस (निवृत्त) यांनी स्वाक्षरी केली.