संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागील तीन दिवसात तापमानाचा पारा एकदम खाली उतरल्यामुळे व बदलत्या ऋतुचक्राचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत असून घरोघरी सर्दी,खोकला ,ताप ,व्हायरल इन्फेक्शन यासारख्या आजारी समस्यांनी ग्रासलेल्या रुग्णसंख्या दिसत आहे त्यामुळे येथील शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिकच दिसत आहे.
सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने सर्दी,खोकला, तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत.मागील तीन दिवसापासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत या बदलामुळे साथीचे आजार वाढू लागले आहेत.सर्दी,ताप,खोकला ,अंगदुखी, पोटदुखी या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. मोठ्याप्रणाने लहान मुलानाही घशात खवखव होणे, कान, नाकाच्या आजारासह सर्दी, आजारांनीही ग्रासल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे खाजगी व सरकारी दवाखान्यात रुग्णांची गर्दी होत आहे.