वातावरणातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णामध्ये वाढ

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- वातावरणातील बदलामुळे कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात नागरिकांच्या प्रकृतीवर व्हायरल इन्फेक्शनचा परिणाम झाल्याने उपचारासाठी खाजगी आणि सरकारी रुग्णालयात रुग्णांची मोठी संख्या दिसून येत आहे. कामठी तालुका प्रशासनाने एच 3,एन 2 याबाबत देखील खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे.

कामठी तालुक्यातील अनेक नागरिकांना खोकला,सर्दी,ताप ,अंगदुखी ,गरगरने यासारखे परिणाम दिसून येत आहेत. राज्यभरात एच 3,एन 2 या व्हायरस ने धुमाकूळ घातला असून नागरिकामध्ये या व्हायरस मुळे भीती निर्माण झाली आहे.लहान बालकापासून अबाल वृद्धपर्यंत साऱ्यांनाच या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.व्हायरल इन्फेक्शन चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून अनेकांकडून खाजगीसह रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली जात आहे. दरम्यान वातावरणीय बदलामुळे देखील यात भर पडली आहे.खाजगी रुग्णालयासह सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.केवळ तरुणच नव्हे तर लहान बालकांच्या प्रकृतीवर देखील मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत असून मोठ्या संख्येत बालकाना पालकवर्ग रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाताना दिसत आहेत.

सर्दी, ताप,खोकला ,अंगदुखी ,चक्कर येणे ,अशक्तपणा येणे यासारखे परिणाम या आजाराची लागण झाल्यावर दिसून येत आहे तर काहींना तीव्र स्वरूपाची डोळेदुखी व घसादुखी देखील सुरू झाली आहे.

व्हायरल इन्फेक्शन ची लागण झाल्या नंतर काही दिवस योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.अन्यथा पुन्हा प्रकृतीत बिघाड होऊ शकतो.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हॉय टेंशन टॉवर लाईनचा तार तुटुन लागलेल्या आगीत गहु पिकाची राखरांगोळी

Fri Mar 31 , 2023
– १४ एकर शेतातले गहु पिक जळुन शेतक-यांचे ७ लाखाचे नुकसान.  कन्हान :- खोपडी येथील शेतकरी हयांनी सालवा गांगनेर शेतशिवारातील हॉय टेंशन टॉवर लाईन चा तार तुटुन गव्हाच्या उभ्या पिकात पडुन आग लागुन १२ एकर शेतातील गव्हाची राखरांगोळी होऊन शेक-यांचे ७ लाख रूपयाचे नुकसान होऊन चिंताग्रस्त झाल्याने माजी खासदार प्रकाश जाधव हयानी हॉय टेंशन टॉवर लाईन विभागाने त्वरित शेतक-यांना नुकसान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com