निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर होत असल्यास माहिती द्या, आयकर विभागाचे नागरिकांना आवाहन

यवतमाळ :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची नुकतीच घोषणा झाली आहे. ही निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासोबतच यादरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तीकर विभागाने टोल फ्री तसेच व्हॅाट्सअॅप क्रमांकासह ई-मेल पत्ता जारी केला असून अशा पैशाचा वापर होत असल्सास त्यावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या असून पारदर्शक पद्धतीने निवडणुका पार पडाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागही तयार असून दरम्यानच्या कालावधीत काळ्या पैशांच्या व्यवहारावर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. निवडणुकीत वापरला जाणारा काळा पैसा, रोख रकमेचे वाटप, रोख रकमेची हालचाल आदी संशयास्पद गोष्टी नजरेस पडल्यास नागरिकांनी थेट आयकर विभागाशी संपर्क साधावा. संबंधित माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख ही गुप्त ठेवण्यात येणार आहे.

नागरिकांनी माहिती देण्यासाठी 1800-233-0355 किंवा 1800-233-0356 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. एखाद्या घटनेची छायाचित्रे, व्हिडिओ ईत्यादी माहिती 94033 90980 हा व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावीत. सदर मजकूर nagpur.addldit.inv@incometax.gov.in किंवा nashik.addldit.inv@incometax.gov.in या मेल आयडीवर मेलही करता येईल, असे आयकर विभागाचे नागपूर येथील उप आयकर निदेशक (अन्वेषण) अनिल खडसे यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने ठिकठिकाणी आरोग्य शिबीरांचे आयोजन

Fri Oct 18 , 2024
यवतमाळ :- राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून व धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या समन्वयाने वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने विविध ठिकाणी मोफत सामुदायीक आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील दुर्गम भागात वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विषयातील तज्ञ डॉक्टर्सकडून हृदयरोग, स्त्रीरोग, सर्जरी, अस्थिरोग इत्यादी प्रकारच्या रुग्णांची तपासणी तथा रोग निदान आणि उपचार शिबीरे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश जतकर यांच्या मार्गदर्शनात १२ ठिकाणी घेण्यात आले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com