संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील बळीराजाचे नगदी पीक म्हणून ओळखलं जाणारे सोयाबीन पीक सोयाबीन पिकावर बळीराजाचं समोरील जगण्याचं आर्थिक बजेट बसवल जाते परंतु यावर्षी बसवलेल्या बजेटमध्ये आंमदनी अठ्ठनी खर्च रुपया अशी गत सोयाबीन पिकाची झाली आहे.
बळीराजाने सोयाबीन पीक नगदी म्हणून पेरणी केली.परंतु महागाईच्या जमान्यात सोयाबीन पिकावर केलेला खर्च नेहमी अवघड झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.सोयाबीन पेरणी पासून ते काढणीपर्यंत बळीराजांना पैशाचे तासच लावावे लागते. सोयाबीन काढणीला मजुरांना बोलावले तर तेही परवडेनासे झाले आहे.कारण दरवर्षी पेक्षा यावर्षी मजुराची एकरी 3500 रुपये झाली आहे अशावेळी उसनवारी करून आणलेला पैसा फेडावा तरी कसा ?असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.दरवर्षीचा अनुभव घेत बळीराजानी यावर्षी सोयाबीन पिकाचा पेरा घेतला. परंतु यावर्षी सोयाबीन काढणिपर्यंत बळीराजांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
सुरुवातीला जून महिना कोरडाच गेला.त्यामुळे सोयाबीनची पेरणी उशिरा लागली त्यानंतर बळीराजाने कोळपनी,निंदन व किटकनाशक फवारणी आटोपली की एलो मोझ्यक ने बळीराजा चिंतेत सापडला.अशा एक ना एक अनेक संकटांना बळीराजांना सामोरे जावे लागले.एलो मोझ्याक रोगाचा नायनाट करण्यासाठी बळीराजाने बाजारातून विविध महागड्या औषधाची फवारणी केली परन्तु त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे बळीराजातुन चर्चिल्या जाते..