मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नेते, पत्रकार रवींद्र वैद्य यांना श्रद्धांजली

मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, पत्रकार रवींद्र वैद्य यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, संयुक्त महाराष्ट्र, गोवा-दमण मुक्ती आणि विविध सामाजिक चळवळीत ते अग्रभागी राहिले. आदिवासींच्या समस्यांना वाचा फोडणारे पत्रकार, त्यासाठी आंदोलन करणारा सामाजिक कार्यकर्ता अशा विविध रुपात त्यांनी अविरत कार्य केले. आणीबाणीतही त्यांनी कारावास भोगला. गरिबांसाठी, वंचितांसाठी झटणारे समाजकारण-राजकारण आणि पत्रकारितेत आपला ठसा उमटविणारे ज्येष्ठ नेते, पत्रकार रवींद्र वैद्य यांना भावपूर्ण श्रद्धांजली

NewsToday24x7

Next Post

व्यापाऱ्यांच्या राज्यव्यापी संघटनेचा वर्धापन दिवस राज्यपालांच्या उपस्थितीत साजरा

Fri May 26 , 2023
केंद्र व राज्य शासनाप्रमाणे स्थानिक शासनाने व्यापार सुलभीकरण करावे – राज्यपाल रमेश बैस मुंबई : देशाला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट प्राप्त करण्यामध्ये व्यापाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. व्यापाऱ्यांचा संबंध स्थानिक प्रशासनाशी अधिक येतो. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाप्रमाणे स्थानिक शासनामध्ये ‘व्यापार सुलभीकरण’ (इज ऑफ डुईंग बिझनेस) करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.    […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com