– जील्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन
गडचिरोली :- कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता नैसर्गिकरीत्या आढळून येणाऱ्या रानभाज्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहेत. रानभाज्या रोगप्रतिकार शक्ती वाढवून आपल्याला आजारापासून दूर ठेवत असल्यामुळे नागरिकांनी दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश करावा, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)व कृषि विभाग, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन कृषि चिकित्सालय, शासकिय रोपवाटीका, सोनापुर गडचिरोली येथे आज करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन डॉ. होळी यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, राजेंद्र भुयार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा, बसवराज मास्तोळी, पशुसंवर्धन उपायुक्त घाडगे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ.संदिप कऱ्हाळे, नाबार्डचे पौनीकर,, स्मार्ट प्रकल्पाच्या नोडल अधिकारी अर्चना राउत, विषय विशेषज्ञ सुचित लाकडे, प्रगतशिल महिला शेतकरी प्रतिभा चौधरी, भालचंद्र ठाकुर, चंद्रशेखर भडांगे, शेतकरी गटाचे सभासद, महिला शेतकरी व महिला बचत गटांच्या सदस्य यावेळी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मस्तोळी यांनी रानभाज्यांचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्यावर भर देणेबाबत मार्गदर्शन केले. डॉ.संदिप कऱ्हाळे,वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्व विषयी सविस्तर माहिती दिली. सुचित लाकडे यांनी रानभाज्याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये रानभाज्यांची ओळख, महत्व, आरोग्यास होणारे फायदे, उपयोग, गुणधर्म या विषयी सविस्तर माहिती दिली. प्रतीभा चौधरी यांनी रानभाज्यांचे आहारामध्ये जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले.
दिनांक 09 ते 15 ऑगस्ट 2024 दरम्यान तालुका स्तरावर रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी / महिला शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी सहभाग घेण्यासाठी प्रकल्प संचालक आत्मा, गडचरोली यांनी आवाहन केले आहे. तालुका स्तरावर रानभाजी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असुन सदर स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार रु.2001, द्वितीय पुरस्कार रु.1501, तृतीय पुरस्कार रु.1001 देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी किमान 10 स्पर्धक किमान 5 पाककृती आणने आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक अर्चना राउत, नोडल अधिकारी, स्मार्ट, जिल्हा अंमलबजावणी कक्ष गडचिरोली, यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अभिजीत कापगते, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले.
रानभाजी महोत्सवाचे औचीत्य साधुन रानभाजी माहिती पुस्तीकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमात 20 शेतकरी गट, महिला शेतकरी गट, माविमचे गट, इ. गटामार्फत रानभाजी व रानभाज्यांचे पदार्थाचे प्रदर्शन व विक्री करीता उपलब्ध करुन देण्यात आले होते. सर्व उपस्थित गटांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवुन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सुरज पाटील, स. अ.श्री. हेंमंत आंबेडारे, हेमंतकुमार उंदिरवाडे, बालु गायकवाड, किशोर कांबळे, लखन माटे, तालुका स्तरीय तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सर्व, गोकुल मुनघाटे व अरुन कोटपल्लीवार यांनी सहकार्य केले.