संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– दोषींना फाशीची शिक्षा न झाल्यास बरीएम तर्फे शहरात तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा
कामठी :- मणिपूर मध्ये जमावाकडून दोन महिलांना पकडण्यात आले ,त्यानंतर त्यांना विवस्त्र करून त्यांची नग्न धिंड काढण्यात आली.या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून ही घटना अतिशय निंदनीय असून मानवतेला काळिमा फासणारी आहे.त्या पीडित महिलांची अशी विवस्त्र धिंड काढनाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या अन्यथा बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा बरीएमचे विदर्भ महासचिव व कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम यांनी तहसीलदार अक्षय पोयाम यांना दिलेल्या सामूहिक निवेदनातून दिला आहे.
अजय कदम यांनी सांगितले की मणिपूरच्या घटनेतील एका महिलेचे पती सैनिक होते .जो सैनिक देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात आहे ,त्याच्या पत्नीवर असा अन्याय होणे योग्य नाही .हा मानवतेला मोठा कलंक आहे.आपल्या संस्कृतीत महिलांना एक विशेष मानाचे स्थान आहे.तेव्हा महिलांची अशी विवस्त्र धिंड काढणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसह आज बरीएम च्या वतीने विदर्भ महासचिव अजय कदम यांच्या नेतृत्वात कामठी तहसीलदार अक्षय पोयाम यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले व नराधमांना फाशीची शिक्षा न झाल्यास शहरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा सुद्धा देण्यात आला.
निवेदन देताना नारायण नितनवरे, मनोहर गणवीर,विष्णू ठवरे, उदास बन्सोड, सुभाष सोमकुवर, दीपक सीरिया, अश्फाक कुरेशी,अनुभव पाटील, मनीष डोंगरे,दिपंकर गणवीर, सुमित फटिंग,अमित मेश्राम,श्रीनिवास ढोके,विक्की तांबे आदी उपस्थित होते.