सिव्हिल लाईन्स वॉकर स्ट्रीट येथील स्मार्ट टॉयलेटचे लोकार्पण

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे सिव्हिल लाईन्स येथील वॉकर स्ट्रीट परिसरातील ‘स्मार्ट स्वच्छतागृहाचे’ मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते सोमवारी (ता:१४) लोकार्पण करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, उपायुक्त प्रकाश वराडे, डॉ. गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (स्लम) कमलेश चव्हाण, देवेन्द्र भोवते, वॉकर्स क्लबचे प्रशांत उगेमुगे, दिनेश नायडू प्रवीण काळे राहुल घरोटे  संजय चौरसिया, ब्रिजेश साहू, अभिषेक ठाकूर  देवेन अग्रवाल, मनपाचे कनिष्ठ अभियंता मनोज रंगारी सचिन चावटे, अरुण पेठेवार, कंत्राटदार श्रीमो कन्स्ट्रक्शनचे कपिल गुप्ता,  राजीव चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले स्मार्ट टॉयलेट अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असे आहे. स्मार्ट टॉयलेट वातानुकूलित असून, महिलांसाठी दोन प्रसाधनगृहे व चेंजिंग रूम तर पुरुषांसाठी तीन मुतारी व दोन शौचालयाची सोय आहे. या स्वच्छतागृहाला सेन्सारवर आधारित स्मार्ट प्रवेशद्वार असून ते उघडण्याची वा बंद करण्याची गरज नाही.

प्रसाधनगृहाच्यावर सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. तसेच तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेस्ट रूम ची सोय देखील स्मार्ट टॉयलेट मध्ये आहे. याशिवाय हँड ड्रायर, वॉश बेसिनची महिलांसाठी सुविधा करण्यात आली आहे. स्वच्छतेसोबतच संपूर्ण परिसर सुंदर असावे यासाठी प्रवेशद्वारावर झाडे लावण्यात आलेले आहेत.

मनपाच्या या स्मार्ट स्वच्छतागृहामध्ये मुतारीचा वापर नि:शुल्क असून शौचालयाच्या वापरासाठी ७ रुपये, थंड पाण्याने आंघोळीसाठी २० रूपये आणि गरम पाण्याने आंघोळीसाठी ३० रुपये शुल्क निर्धारित करण्यात आलेले आहे. स्मार्ट स्वच्छतागृहाची योग्य देखरेख व्हावी याकरिता मनपाद्वारे स्वच्छतागृहाच्या वरच्या भागात देखरेख करणा-या कर्मचा-यासाठी खोली तयार करण्यात आलेली आहे.

डायनासोर सेल्फी पॉईंट

शेकडोच्या संख्येत लोक वॉकर स्ट्रीटवर प्रभात फेरीसाठी येतात यात काही चिमुकले देखील असतात, लहान मुलांकरिता मार्ट स्वच्छतागृहाच्या बाजूला आकर्षक असे डायनासोर चे सेल्फी पॉईंट लावण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीकरता लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन

Tue Oct 15 , 2024
गडचिरोली :- समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ – २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com