खासदार क्रीडा महोत्सव हँडबॉल स्पर्धेचे उद्घाटन

यशवंत स्टेडियम

मंगळवार, 17 जानेवारी 2023

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील हँडबॉल स्पर्धेचे मंगळवारी (ता.17) सकाळी उद्घाटन झाले. धंतोली येथील यशवंत स्टेडियमवर खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, ज्येष्ठ क्रीडा संघटक बबनराव तायवाडे यांच्यासह आंतरराष्ट्रीय हँडबॉलपटू तथा छत्रपती पुरस्कार विजेत्या अनिता भोतमांगे, मुक्ता देशमुख, भावना भोतमांगे, अश्लेषा इंगोले आणि प्रीति सुपारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हँडबॉलचे उद्घाटन झाले. याप्रसंगी स्पर्धेचे कन्वेनर विशाल लोखंडे, समन्वयक माजी नगरसेवक लखन येरवार, नितीन जांगिटवार, सुनील भोतमांगे, पंकज कोठारी आदी उपस्थित होते.

यशवंत स्टेडियमवर महिला व पुरूष खुला गट आणि 17 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात 18 जानेवारी हँडबॉल स्पर्धा चालेल.

निकाल :

U-17 मुले

1. लखोटिया भूतडा मात भवन्स : 14-9

2. केंद्रीय विद्यालय मात धंतोली क्रीडा मंडळ : 19-14

3. केंद्रीय विद्यालय मात सांदीपनी पब्लिक स्कूल : 23-03

4. सांदीपनी पब्लिक स्कूल मात प्रहार मिलिटरी स्कूल : 11-0

5. स्कूल ऑफ स्कॉलर्स मात जी.एच.रायसोनी : 13-8

6. केंद्रीय विद्यालय-बी मात स्कूल ऑफ स्कॉलर्स : 16-14

U-17 मुली

1. ललीता पब्लिक स्कूल मात प्रहार मिलिटरी स्कूल : 03-02

2. केंद्रीय विद्यालय-बी मात स्कूल ऑफ स्कॉलर्स : 11-09

3. केंद्रीय विद्यालय-बी मात ललीता पब्लिक स्कूल : 07-02

4. केंद्रीय विद्यालय-बी मात प्रहार मिलिटरी स्कूल : 14-01

5. जी.एच. रायसोनी मात केंद्रीय विद्यालय-ए : 02-01

6. संस्कार विद्या सागर मात जी.एच.रायसोनी : 09-01

पुरूष

1. क्रीडा प्रबोधिनी-ए मात लखोटिया ज्यूनिअर कॉलेज : 25-18

2. फ्रेन्ड्स क्लब मात फाल्कम : 25-02

3. नागपूर सिटी पोलिस मात शिव छत्रपती क्रीडापीठ : 22-19

4. क्रीडा प्रबोधिनी-बी मात भगवान नगर : 27-16

महिला

1. केंद्रीय विद्यालय मात ललीता पब्लिक स्कूल : 8-0

2. फ्रेन्ड्स क्लब मात प्रहार मिलिटरी स्कूल : 14-0

 

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फुकट नगर कांद्री येथे वेकोलि सुरक्षा अधिकारी ने ३ टन २०० किलो चोरीचा कोळसा पकडला

Tue Jan 17 , 2023
मोतीराम रहाटे, प्रतिनिधी कन्हान (नागपुर) : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत फुकट नगर कांद्री येथे सहा आरोपींनी कोळसा चोरुन विकण्यासाठी जमा करुन ठेवल्याने वेकोलि सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे यांनी पकडुन कन्हान पोस्टे ला तक्रार केल्याने कन्हान पोलीसानी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपीचा शोध सुरु केला आहे. शनिवार (दि.१४) जानेवारीला रात्री ११ वाजता दरम्यान वेकोलि कामठी उपक्षेत्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com