लर्निंग 2.0 या अभिनव उपक्रमाचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उदघाटन

मुंबई :- बृहन्मुंबई महानगरपालिका आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र शासनाच्या सहयोगाने रिड मुंबई, ग्रीन स्कुल-टेरेस फार्मिंग, विद्यार्थ्यांचे डिजिटल /रोबोटीक स्किलिंग,द स्मायलिंग स्कुल प्रोजेक्ट, समावेशक शिक्षण व बीएमसी डॅशबोर्डचा समावेश असलेल्या लर्निंग 2.0 या अभिनव उपक्रमाचे उदघाटन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

वुलन मिल, मनपा एमपीएस शाळा, दादर येथे शनिवारी झाला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग विविध उपक्रम हाती घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रिड मुंबई, ग्रीन स्कुल-टेरेस फार्मिंग, विद्यार्थ्यांचे डिजिटल /रोबोटीक स्किलिंग,द स्मायलिंग स्कुल प्रोजेक्ट, समावेशक शिक्षण व बीएमसी डॅशबोर्डचा समावेश असलेल्या लर्निंग 2.0 असे अभिनव उपक्रम सध्या राबविले जात आहे.

यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक सदस्य व संचालक शिशिर जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

इमारतीच्या टेरेसवर बनविलेले किचन गार्डन प्रकल्प, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम लॅब, रिड मुंबई लायब्ररी यांचे उदघाटन मंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सह आयुक्त (शिक्षण ) कुंभार व प्रोजेक्ट मुंबईचे शिशिर जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी कंकाळ यांनी केले. या सर्व अभिनव प्रोजेक्टच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या संस्था व व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था देशासाठी आदर्शवत ठरेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Sun Jul 16 , 2023
– दर्जेदार शिक्षणातून ध्येयपूर्ती साध्य होते  – उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक :- राज्य शासनाने मुलींसाठी सुरू केलेली सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्था ही देशासाठी आदर्शवत ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. येथील सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ. ग्रामविकास मंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com