बार्टीतर्फे समता पर्व अभियानात समान संधी केंद्राचे उद्घाटन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका कामठी यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त समतापर्वात समाजकार्य महाविद्यालय (MSW)कामठी येथे समान संधी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष – डॉक्टर रुबीना अन्सारी प्राचार्य  कार्यक्रमाचे उद्घाटक –  हृदय गोडबोले(प्रकल्प अधिकारी नागपूर), प्रमुख अतिथी – सुनिता गेडाम, कन्नाके (समतादूत कामठी) प्रार्थना दिवे(समतादूत कळमेश्वर) राष्ट्रपाल डोंगरे (समता दूत कुही) प्रमुख मार्गदर्शक -डॉ. राष्ट्रपाल मेश्राम सहाय्यक प्राध्यापक कॉलेज ऑफ सोशल वर्क कामठी सूत्रसंचालन -डॉ. मनोज होले प्रास्ताविक – प्रफुल बागडे, आभार प्रदर्शन -उज्वला मेश्राम,

या कार्यक्रमांमध्ये समान संधी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले त्याचप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमांमध्ये समाज कल्याण व बार्टीच्या योजनांची माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्र संबंधी माहिती सांगण्यात आली. महाराष्ट्रात समतापर्वाचे आयोजन बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विभाग प्रमुख डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण व नागपूर जिल्हा प्रकल्प अधिकारी ह्रदय गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त कार्यक्रम पार पाडण्यात आला.या कार्यक्रमाला अध्यापक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सामाजिक संगठनों द्वारा इफ्तार का आयोजन 

Thu Apr 13 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- शहर के विभिन्न मुस्लिम सामाजिक संगठनों द्वारा रमजान के पवित्र महीने में रोजेदारों के लिए इफ्तार का आयोजन किया गया यह आयोजन इमली बाग स्थित मुस्लिम समाज भवन कामठी डॉ मोहम्मद अनवर सिद्दीकी अध्यक्ष नागपुर शहर जमात ए इस्लामी हिंद मुख्य अतिथि महाराज आफ नागपुर मग्धुजी भोसले, डीसीपी श्रावन दत्त, 5 जून नागपुर शहर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com