पालकमंत्र्यांच्या हस्ते आपत्कालीन वापराच्या पोर्टेबल टेंटचे उद्घाटन

– प्रत्येक तालुक्याला २ याप्रमाणे जिल्ह्याला ३२ टेंट प्राप्त

यवतमाळ :- आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरते निवारागृह म्हणून वापरण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून जिल्ह्याला ३२ पोर्टेबल टेंट प्राप्त झाले आहे. या टेंटचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते आज उद्घाटन करुन वितरण करण्यात आले. प्रत्येक तालुक्यास दोन याप्रमाणे टेंट वितरित करण्यात आले.

यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतिश मून यांच्यासह शोध व बचाव पथकाचे सदस्य उपस्थित होते.

मान्सून कालावधीत बरेचदा अतिवृष्टी किंवा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो. नदी नाल्यांना पुर आल्याने वाहतूक बाधित होते. गावात, घरात पाणी शिरण्याचा घटना घडतात. अशा प्रसंगी बाधित नागरीकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविणे आवश्यक असते. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्राप्त हे टेंट सुरक्षित तात्पुरता निवारा म्हणून उपयोगात येणार आहे.

या टेंट मध्ये बाधितांची व्यवस्था करण्यासोबतच तात्पुरते रुग्णालय देखील सुरु करता येणार आहे. जिल्ह्यासाठी ३२ टेंट प्राप्त झाल्यानंतर आज पालकमंत्री संजय राठोड यांनी टेंटचा शुभारंभ केला व प्रत्येक तालुक्यास प्रत्येकी दोन याप्रमाणे टेंटचे वितरण करण्यात आले. पालकमंत्र्यांनी यावेळी टेंटच्या उपयुक्ततेची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतिश मुन यांच्याकडून जाणून घेतली.

बचाव पथकात प्रशिक्षित मनुष्यबळ नेमा

मान्सून काळात बरेचदा शोध व बचाव पथकांना महत्वाची तितकीच जोखमीची भूमिका पार पाडावी लागते. पुरपरिस्थितीत अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढणे पथकाचे कौशल्यपूर्ण काम आहे. या पथकात नेमणूक करतांना प्रशिक्षित मणूष्यबळ नेमा, प्रत्येक प्रसंगाला खंबीरपणे पुढे जाण्याचे उत्तम प्रशिक्षण त्यांना द्या, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

त्र्यंबकेश्‍वर येथून ‘ओम प्रतिष्ठान’द्वारेे ‘प्रसाद शुद्धी चळवळी’स प्रारंभ !

Mon Jun 17 , 2024
– संत-महंत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून शुद्ध प्रसादाची संकल्पना अस्तित्वात: भारतभर चळवळ राबवण्याचा निर्धार ! त्र्यंबकेश्‍वर :- सर्व मंदिरांमध्ये भाविकांकडून जो प्रसाद अर्पण केला जातो, त्या प्रसादात अनेकदा धर्मांध भेसळयुक्त पदार्थ मिसळतात. त्यामुळे हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. या गैरप्रकाराच्या विरोधात व्यापक स्वरूपात ‘प्रसाद शुद्धी चळवळ’ राबवण्यात येणार आहे. त्यासाठी संकल्पना ‘ओम प्रतिष्ठान’, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संत-महंत यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!