चुनाभट्टी आरोग्यवर्धिनी केंद्राचे लोकार्पण

मीनागपूर :- नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात सोमवारी (ता. ४) लक्ष्मीनगर झाोन अंतर्गत चुनाभट्टी, जुनी अजनी, अंबिका नगर, आरोग्यवर्धिनी केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. माजी नगरसेवक मुन्ना यादव यांनी फित कापून आरोग्यवर्धिनी केंद्राचे लोकार्पण केले.

यावेळी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अति. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कांबळे, माजी नगरसेविका लक्ष्मी यादव, मिनाक्षी तेलगोटे, माजी नगरसेवक किशोर वानखेडे, प्रकाश भोयर, माजी नगरसेवक मुन्ना यादव वैद्यकीय अधिकारी डॉ. बानाईत, वैद्यकीय अधिकारी खामला यु.पी.एच.सी. डॉ. केतकर आदी उपस्थित होते.

चुनाभट्टी, जुनी अजनी, अंबिका नगर आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत जनसामान्यांपर्यंत प्राथमिक आरोग्य सेवा निःशुल्क पुरविल्या जाणार आहेत. तसेच माताबाल आरोग्य, लसीकरण व इतर सेवा देखील मोफत दिल्या जातील.

केंद्र शासनाकडून १५व्या वित्त आयोग निधी अंतर्गत नागपूर शहराकरीता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वर्ष २०२२-२३ करीता २० आरोग्यवर्धिनी केंद्राची मान्यता प्राप्त झााली आहे. तसेच पुढील अधिक आरोग्यवर्धिनी केंद्राची मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. आजपर्यंत एकूण ९ आरोग्यवर्धिनी केंद्राची सुरुवात झाालेली असून या शृंखलेत गोरले ले-आउट येथे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तसेच रहाटे टोली येथे रहाटे नगर, (रामटेके नगर) आरोग्यवर्धिनी केंद्र, श्यामनगर (भवानी नगर), रोज नगर, नागोबा मंदिर (न्यु म्हाळगी नगर), बाबा दिप सिंग नगर, समता नगर पूल, मनिष नगर कुशी नारा सोसायटी, भिवसेनखोरी भिमसेन नगर व आता चुनाभट्टी, जुनी अजनी, अंबिका नगर येथे नवव्या आरोग्यवर्धिनी केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रथमच शेतकऱ्यांना केळी पिकावरील सीएमव्ही रोगासाठी नुकसानभरपाई - मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

Tue Sep 5 , 2023
मुंबई :- जळगांव जिल्ह्यातील २७४ गावांतील १५ हजार ६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकांचे सन २०२२ मध्ये सी.एम.व्ही. (कुकुंबर मोझंक व्हायरस) या रोगामुळे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसानापोटी १९ कोटी ७३ लक्ष रुपये एवढ्या मदतीचे वितरण करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे. (कुकुंबर मोझॅक व्हायरस) या रोगामुळे ‘केळी’ या बहुवार्षिक पिकांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com