आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रा उद्घाटन

नागपूर :- केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना थेट लाभ मिळावा या उद्देशाने देश पातळीवर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेअंतर्गत बुधवार (ता ७) रोजी गांधीबाग झोन येथील भूतेश्वर नगर मैदान येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर दयाशंकर तिवारी, मनपाचे सहायक आयुक्त गणेश राठोड, घनशाम पंधरे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी संबधित झोन मध्ये उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना विकसित भारतासाठीची शपथ घेतली.

केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेतील योजनांची माहिती, प्रचार व प्रसिद्धीसाठी सुसज्ज व्हॅन्स अर्थात रथ मनपाच्या दहाही झोन मध्ये फिरत असून, विविध शिबीर घेत नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविण्यात येत आहे. याअंतर्गत बुधवार (ता.७) गांधीबाग झोन येथील भूतेश्वर नगर आणि वंदेमातरम् उद्यान, राजवाडा पॅलेस व नेहरूनगर झोन येथील सद्भावना नगर मैदान आणि पवनसुत नगर मैदान येथे विशेष शिबिर घेण्यात आले. यावेळी उपस्थितांना विकसित भारतासाठीची शपथ घेत या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत असून, मनपाद्वारे अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जात आहे. मनपाद्वारे झोननिहाय पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना आणि ई-बस या योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय शिबिरांमध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, पी.एम.स्वनिधी बद्दल माहिती तसेच असंसर्गजन्य आजार निदान व उपचार देखील दिल्या जात आहेत.

8 रोजी सतरंजीपूरा व लकडगंज झोन मध्ये विकसित भारत संकल्प यात्रा

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत गुरुवार (०८) रोजी सतरंजीपुरा झोन येथील विनकर कॉलोनी मैदान आणि तुकडोजी सभागृह, मेहदीबाग व लकडगंज झोन येथील सुर्यानगर मैदान, प्रभाग क्र. २४ आणि भवानी मंदिर पारडी, प्रभाग क्र. २५ येथे आयोजित केल्या जाणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांसाठी यंदा 70 कोटींचा निधी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Thu Feb 8 , 2024
Ø जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही Ø काटोल तालुक्यातील विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन नागपूर :- पाणंद रस्त्यांच्या दुरुस्तीची शेतकऱ्यांची सर्वात जास्त मागणी असते. यासाठी 70 कोटी रुपयांचा निधी यंदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या तीन वर्षात जिल्ह्यातील सर्व पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. काटोल तालुक्यातील पट्टे वाटप व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com