नागपूर :- पोलीस ठाणे मानकापुर हद्दीत प्लॉट नं. ६३. इंगोले लॉन मागे, गोरेवाड़ा रिंग रोड, मानकापुर, नागपुर येथे राहणारे फिर्यादी चे आई वडील हे आपले घराला कुलूप लावुन त्यांचे लहान मुलाकडे परदेशात लंडन, यु.के. येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे वडीलांचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडून, घरात प्रवेश करून बेडरूम मधील आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने एकुण किंमती अंदाजे १,५५,०००/-रु. चा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी दिपक प्रतापरॉय व्यास, वय ५० वर्षे, रा. ग्रीनव्हीला अपार्टमेंट, ईब्राहीम रोड, गोरेवाडा, मानकापुर, नागपुर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे मानकापुर येथे पोउपनि, कांबळे यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५ (अ), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.