संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- स्वगिय श्री सतिश साळवी यांच्या चतुर्थ स्मृती दिनी निमित्य ग्रामोन्नती प्रतिष्ठाण नागपुर (महाराष्ट्र) व्दारे ” आधार ” जनसामान्य रूग्णसेवा शुभारंभ करण्यात आला असुन निशुल्क साहित्य वापरा, लवक र बरे व्हा ! आणि इतराना सेवा मिळावी म्हणुन साहित्य संस्थेत परत करा. संस्थेव्दारे काही महिन्यातच मोठी रूग्ण सेवा लॉयबरी, शीत शव पेटी, रूग्णवाहि काही उपलब्ध करण्याचा मानस प्रकाश जाधव हयानी व्यकत केला आहे.
ग्रामोन्नती प्रतिष्ठाण नागपुर (महाराष्ट्र) या सेवा भावी संस्थे व्दारे सामाजिक बांधिलकी जोपासत सर्व सामान्याची सेवा करण्याच्या सार्थ हेतुन पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, कृषी, शिक्षण, सांस्कृतिक, क्रिडा, उद्योग आणि रोजगार आदी प्रमुख विषयाचे नियोजन करून विविध उपक्रम राबवुन नि: सार्थ उदिष्टाची पुर्तता करण्यास संस्था निरंतर कार्यरत असुन याचाच एक उपक्रम म्हणुन मंगळवार (दि.२१) मे २०२४ ला सायंकाळी ७.३० वाजता विवेकानंदनगर कन्हान येथे ग्रामोन्नती प्रतिष्ठाण नागपुर चे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या हस्ते स्व. सतिश साळवी यांच्या चतुर्थ स्मृती दिनी ‘ रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा ‘ या सार्थ उदेशाने लोकोपयोगी ” आधार ” जन सामान्य रूग्ण सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मधुकर नागपुरे, इंदल यादव, रेखाताई टोहणे आदी मान्यवरांनी या रूग्ण सेवेची कन्हान शहर व परिसरा तील गरीब व गरजुना अत्यंत आवश्यकता भासत असल्याने या उपक्रमाची स्तुती करून याकरिता सदैव सहकार्य करण्याची हमी देत संबोधित केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन संस्थेचा अहवाल कमलेश पांजरे यांनी सादर केला. गरीब, गरजु रूग्णाना अनेक प्रसंगा ना सामोरे जावे लागते. या महागाईत अनेक रूग्णाची गरज जसे वॉकर, बेड पँन, व्हील चेअर, बैशाखी, युरिन पॉट, असे अनेक साहित्य काही काळासाठी आवश्यक असते, तेही या काळात परवडणारे नाही. साहित्याची विल्हेवाट ही होत नाही. हाच मुख्य विषय लक्षात घेत हे बहुतेक साहित्य उपलब्ध करून निशुल्क साहित्य वापरा, लवकर बरे व्हा ! आणि इतराना सेवा मिळावी म्हणुन नीटनेटके साहित्य संस्थेत परत करा. संस्थे व्दारे काही महिन्यातच मोठी रूग्ण सेवा लॉयबरी, शीत शव पेटी, रूग्णवाहिकाही उपलब्ध करण्याचा मानस असल्याचा मा. प्रकाश भाऊ जाधव हयानी व्यकत केला. कार्यक्रमास शो़भा साळवी, कल्पना जाधव, शालीनी येलकर, वंदना जाधव, रेखा टोहणे, शिल्पा सा़ळवी, ताराचंद निंबाळकर, विठ्ठल मानकर, नामदेव नवघरे, किशोरी अरोरा, बाला नायर, मधुकर नागुपरे, भुषण निंबाळकर, सचिन करंडे, शांताराम जळते, निलकंठ कुरडकर, रवि रंग, दिलीप राईकवार, मोतीराम रहाटे, प्रविण गोडे, सचिन साळवी, बंटी हेटे, प्रतिक जाधव, राजु गणोरकर, सुरेश मानकर, रमाकांत नागपुरे, अमोल सुटे, निशांत जाधव, प्रविण माने, तुषार डोंगरदिवे आदीसह नगरवासी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्विते करिता संस्थेचे पदाधिकारी व सदस्यानी सहकार्य केले.