मध्य नागपुरात शासन आपल्या दारी शिबिराचे उदघाटन

– २५ ऑगस्ट पर्यंत शिबीर चालणार

नागपूर :- सर्वसामान्य जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांर्तगत मध्य नागपुरातील विणकर कॉलोनी मैदान, तांडापेठ येथे बुधवारी (ता२३) विशेष शिबिराचे उदघाटन करण्यात आले.नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा एकाच छताखाली लाभ घ्यावा तसेच शिबिराला मोठ्या संख्येत भेट द्यावी असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले. 

कार्यक्रमात मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, माजी महापौर  दयाशंकर तिवारी, अर्चना डेहनकर, माजी नगरसेवक सर्वश्री. जितेंद्र(बंटी) कुकडे, सुधीर(बंडू) राऊत, महेश(संजय) महाजन, मनपाचे सहायक आयुक्त घनशाम पंधरे यांच्यासह नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

“शासन आपल्या दारी” अंतर्गत मध्य नागपुरातील विणकर कॉलोनी मैदान, तांडापेठ बुधवार २३ ऑगस्ट ते शुक्रवार २५ ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासन आपल्या दारी अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली मिळत आहे. शासनाच्या विविध विभागाच्या सोयीसुविधा देखील एकाच ठिकाणी प्राप्त होत असल्याने अधिकाधिक संख्येत नागरिकांनी या शिबिराला भेट देत लाभ घ्यावा असे आवाहनही मान्यवरांनी यावेळी आपल्या भाषणात केले.

नागरिकांना शिबिरात नगर भूमापन सिटीसर्व्हे, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय सेतू केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभाग, नागपूर महानगरपालिका, अन्न व नागरी पुरवठा विभाग, बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालय आदी विविध विभागांच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धर्मराज प्राथमिक शाळेतर्फे विद्यार्थी निर्मित चांद्रयान प्रतिकृती

Wed Aug 23 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- चांद्रयान ३ च्या यशस्वीतेसाठी धर्मराज प्राथमिक शाळा कांद्री- कन्हानच्या चिमुकल्या विद्या र्थ्यांनी चांद्रयानची प्रतिकृती तयार करुन भारत माता की जय, वंदे मातरम, चांद्रयान विजयी भव ! अशा घोषणा देत चांद्रयान ३ या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. चांद्रयान ३ या मोहिमेविषयी मुख्याध्यापक खिमेश बढिये व शिक्षक अमित मेंघरे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली व संध्याकाळी प्रक्षेपण होणारा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com