विविध दैनिक वृत्तपत्रात नागपूर महानगरपालिकेवर जलसंपदा विभागाची रू. 1600 कोटीची थकबाकी बाबत प्रकाशीत वृत्ताबाबत खुलासा

नागपूर :-विविध दैनिक वृत्तपत्रात नागपूर महानगरपालिकेवर जलसंपदा विभागाची रू. 1600.00 कोटीची थकबाकी बाबत जे वृत्त प्रकाशीत झाले त्याबाबत कळविण्यात येते कि सदर थकबाकी रू. 16.10 कोटी इतकी आहे.

उपरोक्त थकबाकी जलसंपदा विभागाने कन्हान नदीवरून उचल केलेल्या पाण्यावर आकारण्यात येत असलेल्या पाणीपट्टी मध्ये मनपाच्या औद्योगीक वापरांवर 3% ने बिलींग करण्याऐवजी डिसेंबर, 2017 ते जानेवारी, 2019 या कालावधीत 8.65% ने बिलींग करण्यात आल्याने तसेच डिसेंबर 2017 ते मे, 2019 या कालावधीत एस.टी.पी. व प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्राकरिता दंडणीय आकारणी केल्यामुळे उपरोक्त थकबाकी आहे.

याच कालावधी करिता पेंच जलाशयातुन उचल केलेल्या पाण्यावर सुध्दा अश्याचप्रकारे आकारणी करण्यात आली होती. परंतु मनपाने दोन्ही दंडणीय आकारणीवर आक्षेप घेतल्याने फेब्रुवारी, 2019 चे देयकात उपरोक्त आकारणी रद्द करण्यात आली. पेंच जलाशयातुन उचल केलेल्या पाण्यावरची दंडणीय रक्कम निर्लेखीत केली मात्र कन्हान नदीवरून उचल केलेल्या पाण्यावरील दंडणीय आकारणी निर्लेखीत न केल्याने फेब्रुवारी, 2024 पर्यंत रू. 16.10 कोटी इतकी थकबाकी दर्शविण्यात आली आहे. मनपाने उचल केलेल्या पाण्याचे देयकांचे नियीमत भुगतान केले आहे. परंतु पाटबंधारे विभाग यांनी त्यांचे दि. 26/04/2024 चे पत्रान्वये फेब्रुवारी 2024 अखेर मनपास देय असलेल्या उपकरातुन रुपये 5.05 कोटी इतकी रक्कम समायोजित करण्यात येत आहे असे कळविले.

जलसंपदा विभागाचे एकतर्फी समायोजन मनपास मान्य नसल्याचे दि. 07/05/2024 चे पत्रान्वये कळविण्यात आले असुन कार्यकारी अभियंता, पेंच पाटबंधारे विभाग यांची दि. 13.05.2024 रोजी प्रत्येक्ष भेट घेऊन सदर थकबाकी निर्लेखीत करण्याची कार्यवाही सत्वर करणेस कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जगातील अनेक वैज्ञानिक सिद्धांत बुद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाशी संबंधित आहेत - माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर

Fri May 24 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- सकारात्मक आणि विधायक जीवनपद्धतीचा वैज्ञानिक दृष्टिकोन ,त्याचा विकास बौद्ध धम्मात अंतर्भूत आहे.जगातील अनेक वैज्ञानिक सिद्धांत बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानाशी संबंधित आहेत.असे मौलिक प्रतिपादन माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी बुद्ध जयंती निमित्त येरखेडा येथील बुद्ध धम्म संदेश समितीच्या वतीने धम्महाविरानुवत्र बुद्ध विहारात आयोजित भव्य कँडल मार्च कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. या भव्य कॅन्डल मार्च ची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com