नगर भूमापन कार्यालयात फेरफार अदालतीचे आयोजन  

नागपूर –  नगर भूमापन अधिकारी कार्यालयात फेरफार अदालतीचे 11 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे  आवाहन करण्यात आले आहे.

            मौजा नागपूर (खास ) येथील जनतेच्या नामांतरण प्रकरणाचा निपटारा करणेकरीता नगर भूमापन अधिकारी क्रमांक 01 नागपूर कार्यालयाचे वतीने दिनांक 11 मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाचे परिसरातील प्रशासकीय इमारत क्र.02 वरील दुस-या माळयावर फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.सदर फेरफार अदालत मध्ये येवून जनतेने आपले नामांतरण ( फेरफार ) प्रकरणे दाखल करुन लाभ करुन घ्यावा.

            मौजा नागपूर (खास ) येथील नामांतरण जसे खरेदी विक्री वारस नोंद हक्कसोडपत्रक, गहाण/तारण, मृत्यपत्र, बक्षीसपत्र, वाटणीपद्वहिबानामा, नावत बदल, सामिलीकरण, ए. कु. मे. नोंद कमी करणे, घोषणापत्र नोंद,भडेपट्टयाने झालेल्या नोंदी अद्यावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार आपले प्रलंबीत असलेले विविध प्रकारचे नामांतरणाचे प्रकरण सदर फेरफार अदालतमध्ये दाखल करण्यात यावे. तसेच या कार्यालयात यापूर्वी दाखल केलेले नामांतरण प्रकरणाला त्रृट्या/उणिवा असल्यास त्याची पूर्तता करुन नियोजित फेरफार अदालत मध्ये दाखल करणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. विविध प्रकारचे नामांतरण प्रकरनी  खालील प्रमाणे दस्ताऐवज संलग्न करणेचे आहे.

(खरेदी नोंद :- नामांतरण अर्ज, फोटो, आधार कार्ड, खरेदीबाबत सत्यप्रत,सुची क्र.दुसरी प्रत, लिफाफे अधिपत्रिका, वारस नोंद :- मृत्यूदाखला, वारसान प्रतिज्ञापत्र,सर्व वारसानांचे आधारकार्ड, 25 रुपये पोस्टाची  तिकीट, लावलेली लिफाफे, वारस जवाबाकरिता दोन साक्षदार, आधारकार्ड सह अर्ज सादर करावे, बक्षिसपत्र नोंद :- नामांतरण अर्ज फोटो, आधारकार्ड, बक्षिसपत्राची छायांकित प्रत, मुळ सुची, क्र. ची प्रत लिफाफे, आखिव पत्रिका,  हक्कसोडपत्र नोंद :- नामांतरण अर्ज फोटो,आधारकार्ड,हक्कसोडपत्रा ची छायांकित  प्रत, मुळ सुची क्र. 2 ची प्रत, लिफाफे, आखिवपत्रिका, मृत्यूपत्र नोंद :- नामांतरण अर्ज, फोटो आधारकार्ड,मृत्यू लेखाची छायांकित प्रत, मुळ सुची क्र. 3 ची प्रत, आखिवपत्रिाका, गाहान तारण बोझा नोंद :- नामांतरण अर्ज, फोटो, आधार कार्ड, गहाणबोझा दस्त, परिमोचन दस्ताची छायांकित प्रत, बॅकेची नो ड्यू सर्टीफिकेट, वाटणीपत्र नोंद :- नामांतरण्‍ अर्ज, फोटो, आधारकार्ड,वाटणीपत्राची छायांकित प्रत, मुळ सुची क्र. 2 ची प्रत, लिफाफे, आखिवपत्रिका, हिबानामा नोंद :- नामांतरण अर्ज फोटो, आधारकार्ड, हिबानाम्याची प्रत, हिबा देणार, हिबा घेणार व साक्षरारांचे प्रतिज्ञापत्र लिफाफे आखिव पत्रिका, समिलीकरण  :- नामांतरण अर्ज फोटो, आधारकार्ड, मा.जि.अ.भु.अ. यांचेकडील सामिलीकरण आदेशाची प्रत,लिफाफे, आखिवपत्रिका.लिफाफे आखिवपत्रिका, घोषणापत्र नोंद :- नामांतरण अर्ज, आधारकार्ड, नोंदणीकृत घोषणापत्राची  छायांकित प्रत, मुळ सुची क्र. 2 ची प्रत, बांधकाम मंजूर नकाशाची प्रत, लिफाफे आखिवपत्रिका याप्रमाणे कागदपत्र घेवून कार्यालयात फेरफार अदालतीचे वेळी दिनांक 11 मार्च 2022 रोजी सकाळी 10.00  ते 5.00 वाजेपर्यंत हजर राहून आपले नामांतरण अर्ज सादर करावे. सदर नामांतरण अर्ज सादर केलेनंतर आपणास टोकन क्रमांक देण्यात येईल. व लगेच तात्काळ अर्जची नोंद तपासणी व छाणणी करुन 2 तासाचे आत आपले प्रकरणात उचित कार्यवाही करुन देण्यात येईल. व नोटीसची मुदत संपल्यानंतर तात्काळ आपले नामांतरण प्रकरणात कार्यवाही होवून आखिवपत्रिका उपलब्ध होणार आहे तरी सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वेकोलि में “प्रतिष्ठित सप्ताह” का शुभारंभ

Mon Mar 7 , 2022
– श्रम एवं रोजगार संबंधी नियमों का समुचित क्रियान्वयन आवश्यक – डॉ. संजय कुमार नागपुर – वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (वेकोलि) में आजादी का अमृत महोत्सव के अंतर्गत विभिन्न कार्यक्रम आयोजित किए जा रहे हैं। इसी श्रृंखला में दिनांक 07.03.22 से 13.03.22 तक “प्रतिष्ठित सप्ताह” (Iconic Week) मनाया जा रहा है। उक्त सप्ताह श्रम एवं रोजगार मंत्रालय के उप मुख्य श्रम आयुक्त (केंद्रीय) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com