नागपूर :- शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ॲड. नंदा पराते यांनी देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारप्रकरणी भाजपवर टीका केली. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने महिलांवर लैंगिक अत्याचार केले आहेत, लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांच्यासाठी निवडणूक प्रचार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्याप त्यावर एक शब्दही बोलले नाहीत. प्रज्वल रेवन्ना याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्यावर भाजपच्या मदतीने जर्मनीत लपून बसला आहे ,त्यांना त्वरित देशात आणून अटक करावी व कडक शिक्षा व्हावी.परंतु केंद्र सरकार गुन्हा दाखल होऊनही मात्र कार्यही करीत नाही. महिला खेळाडूंवर लैंगिक अत्याचार करणारे भाजपाचे खासदार ब्रजभूषण शरण सिंह अजूनही मोकाटच आहेत. गुन्हा दाखल होऊनही कारवाई मात्र झालेली नाही.
ॲड. नंदा पराते पुढे म्हणाल्या कि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा नारा देणाऱ्या भाजपाच्या राज्यातच महिला अत्याचारी मोकाट आहेत. पंतप्रधानांचा मतदारसंघ वाराणसीमध्ये एका विद्यार्थ्यीनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला, यातील गुन्हेगार भाजपाशी संबंधित आहेत, या गुन्हेगारांनी मध्यप्रदेशात भाजपाच्या प्रचारातही सहभाग घेतला. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर सामुहिक अत्याचार करण्यात आले, मणिपूर जळत आहे पण पंतप्रधान मणिपूरवर बोलत नाहीत व मणिपूरला जातही नाहीत. भाजपाच्या राज्यात मागील दोन वर्षात देशभरातून तब्बल १० लाख महिला बेपत्ता झाल्या आहेत आणि बेपत्ता झालेल्या महिला या महिला गेल्या कुठे? हा गंभीर प्रश्न आहे. भाजपा सरकारमध्ये महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे, असा आरोप ॲड. नंदा पराते यांनी केला.