राज्यपालांच्या उपस्थितीत सैन्य दलातील विभूषित अधिकाऱ्यांची वार्षिक परेड संपन्न

मुंबई :-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज एनसीपीए मुंबई येथून सुरु झालेल्या सैन्य दलातील शौर्य पदांनी विभूषित अधिकारी व जवानांच्या वार्षिक संचलनात – परेड ऑफ व्हेटरन्स – सहभागी होऊन सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, वीर नारी व त्यांच्या कुटुंबियांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. 

राज्यपालांनी सुरुवातीला व्हीलचेअरमध्ये बसून आलेल्या वरिष्ठ सेवानिवृत्त सैनिक अधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना अभिवादन केले. त्यानंतर शेकडो युवक व नागरिकांच्या ‘वंदे मातरम’ च्या जयघोषात त्यांनी माजी सैनिक अधिकाऱ्यांच्या संचालनासोबत चालून माजी सैनिकांप्रती आपली सद्भावना प्रकट केली.

‘परेड ऑफ व्हेटरन्स’चे आयोजन नेव्ही फाउंडेशनच्या मुंबई शाखेने नेव्हीच्या पश्चिम विभागाच्या सहकार्याने करण्यात आले होते.

परेडमध्ये ५०० माजी वीर अधिकारी व जवान तसेच त्यांचे कुटुंबीय व नागरिक सहभागी झाले होते. यावेळी नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंह, आर्मीच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा प्रभागाचे प्रमुख ले जन एच एस कहलों, नेव्ही फाउंडेशन, मुंबई विभागाचे अध्यक्ष कमांडर विजय वढेरा आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्थानिक खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकीक मिळविणे हाच महोत्सवाचा उद्देश : ना. नितीन गडकरी

Mon Jan 9 , 2023
पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्धाटन पी.टी.उषा, मिताली राज, उमेश यादव यांची विशेष उपस्थिती नागपूर : रस्ते, पाणी, वीज याउपर शहराचा सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात विकास करण्याच्या हेतूने खासदार क्रीडा महोत्सवाची संकल्पना पुढे आली. आपल्याकडे प्रतिभेची कमी नाही. या प्रतिभावंतांना प्रोत्साहन देऊन त्यांना खेळण्याची संधी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास पुढे देशाचे नावलौकीक करणारे अनेक खेळाडू पुढे येतील. आपल्या शहरातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com