– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 4 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर येथील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे पदाधिकारी दिनेश पाटील यांच्या घरासमोर उभी असलेली सी डी 100 दुचाकी क्र एम एच 40 ए बी 1028 आज दिवसाढवळ्या दुपारी 2 दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असून यासंदर्भात फिर्यादी दिनेश पाटील यांनी स्थानीक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारुवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .तर फिर्यादी दिनेश पाटील यांच्या घराजवळ रमानगर रेल्वे फाटक जवळ लावून असलेले सीसीटीव्ही कॅमेरे मागील कित्येक दिवसापासून बंद असून हे सीसिटीव्ही कॅमेरे शोपीस ठरले आहेत.हे इथं विशेष!