अरोली :- निमखेडा येथील स्व. इंदिरा गांधी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाशी संलग्नित असलेल्या विश्रांती कॉन्व्हेंट मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम शाळेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात व थाटात नुकतेच पार पडले. यंदा चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य देखणे ठरले..
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थेच्या अध्यक्षा शांता खांडेकर , विशाल खांडेकर, आणि विश्रांती खांडेकर ,प्रमुख पाहुणे म्हणून अरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्नेहल राऊत,राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीकांत शिवणकर,अल्का वासनिक,प्रणय नेरलेवार,सहसचिव रक्षक खांडेकर विशेष अतिथी रवी चव्हाण , बानोर सरपंच माधुरी,दिलीप कपाळे ,शुभम झाडे ,अजय घोडेस्वार सह परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पाहुण्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले व त्यांनी त्यांचे स्थान ग्रहण केल्यानंतर स्नेहसंमेलनास सुरुवात झाली. डॉ .विश्रांती खांडेकर, संस्थेचे मुख्याध्यापक व विशाल खांडेकर यांची भाषण लक्षवेधी ठरले .त्या दोघांनी मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या .सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी आपलं नृत्याची कला सादर केली व संमेलनाचा उत्साह रंगात आणला .वर्षभरात शाळेने केलेले चांगले योगदान म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका आणि उपमुख्याध्यापिकेचा संस्थेतर्फे ट्रॉफी देऊन सत्कार केला.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्ये प्रथम आलेल्या प्रथमेश रंगारी याचाृ पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी कॉन्व्हेंटच्या प्रिन्सिपल लावण्या पातूरी व्हॉइस प्रिन्सिपल बिंदूत गिरीशा शिक्षकवृंद पूजा चौधरी,मंगला काटकर ,रीना दारोडे, रवीना दारोडे ,कोमल तिड़के ,प्रियंका दोरखंडे, रजनी कनिगांट्टी,वाणी पोत्तुला,लतिका झाड़े सह समस्त शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.