बेला : येथील लोकजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सेवानिवृत्त प्राध्यापक व माजी सिनेट सदस्य रमेश पिसे यांच्या हस्ते पार पडले. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेस विद्यार्थी शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष वर्षा बाभुळकर होत्या. एड. अनिल बांगडकर, बुलाराम तळवेकर, राजीव देशमुख सचिव सुबोध देशमुख, रमेश लांबट ,अशोक लांबट आदी संचालक गण व प्राचार्य सुनील मुलेवार मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटन समारंभात निवृत्त प्राचार्य रवींद्र वानखेडे यांना सन 2020-21 चा आदर्श शिक्षक पुरस्कार पाहुण्यांचे हस्ते संस्थेच्या वतीने बहाल करण्यात आला.
ढोल, ताशे, लेझिमच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर दीप प्रज्वलाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. विज्ञान व विज्ञान – पर्यावरण प्रदर्शन, ग्रंथालय, स्वामी विवेकानंद निलयम, महात्मा गांधी संस्कार मंदिर ,विज्ञान प्रयोगशाळा, स्वच्छ्ता, शालेय व्यवस्थापनांची अतिथींनी पाहणी केली. तसेच लोकजीवन ला नावलौकिक मिळवून देणारे शिक्षण महर्षी, निवृत्त प्राचार्य चंपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. संस्थापक यादवराव देशमुख व द्वितीय अध्यक्ष क्रांतीवीर राजारामजी महाले यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. दहावी परीक्षेतील प्राविण्य प्राप्त श्रेया उजवणे हिला स्टुडन्ट ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले संचालन माधवी रणनवरे, व आरती मुलेवार यांनी केले. शाळेचा प्रगती अहवाल प्राचार्य मुलेवार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून मांडला .समारोपप्रसंगी संपूर्ण विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. पर्यवेक्षक मिलिंद शाव यांनी उपस्थितांचे आभार मानले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.