– छोरीया ले आऊट रामटेक येथील घरफोडी व चोरी प्रकरण
– स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगीरी
रामटेक :- दिनांक 25 डिसेंबर रोजी फिर्यादी सुनील मोतीराम पानतावणे वय 40 वर्ष राहणार महेश नगर छोरीया ले आउट रामटेक हे घराला कुलूप लावून टाकळघाट येथे दर्शनासाठी गेले असता दर्शन करून परत आल्यावर कोणीतरी अज्ञात चोराने घराचे आत प्रवेश करून लाकडी अलमारी मधून सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकिस आली होती. याची फिर्यादी पानतावणे यांनी रितसर पोलीस स्टेशन तक्रारही दाखल केली होती. तेव्हा त्यांच्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन रामटेक येथे अपराध क्रमांक 774 ऑब्लिक 22 कलम 457 380 भानवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास स्थानीक गुन्हे शाखेने आपल्या हाती घेऊन तपासचक्रे फिरविली असता अवघ्या ४ दिवसातच सदर प्रकरणाचा छडा लावला.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला असता दिनांक 29 डिसेंबर रोजी गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती च्या आधारे सदर गुन्ह्यात फिर्यादी नामे सुनील मोतीराम पानतावणे वय 40 वर्ष राहणार महेश नगर छोरीया आऊट रामटेक यांचा एक नातेवाईक मुलगा विधी संघर्ष बालक याचा या प्रकरणात सहभाग असण्याची खात्रीशीर माहिती स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विधी संघर्ष बालक यास विचारपूस करण्यासाठी त्याच्या राहत्या घरी जाऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की अंदाजे आठ ते दहा महिने अगोदर तो त्याचे नातेवाईक नामे सुनील पानतावणे यांचे कडे रामटेक येथे राहत होता त्यादरम्यान सुनील पानतावणे याचे राहते घराचे मुख्य दरवाजाचे दोन चावी असून एक चावी सुनील पानतावणे व एक चावी त्यांची पत्नी जवळ राहात असल्याचे व तसेच सुनील पानतावणे हे घराला लॉक लावून परिवारासह बाहेर जात असताना सुद्धा त्यांचे घरातील आलमारी नेहमी उघडी राहत असून व ड्रावरमध्ये पैसे व दागिने नेहमी राहत असल्याचेही त्याला माहिती होते. त्यानुसार सुनील पानतावणे यांच्या घरात चोरी करण्याची योजना त्याने खूप अगोदरच आखुन ठेवलेली होती. सात ते आठ महिने अगोदर वेळ मिळतात त्याने घरातील चावीचे सेट मधून घराचे मुख्य दरवाजाची चावी चोरून जवळ ठेवली होती. दरम्यान काही महिन्या अगोदर पासून तो सुनील पानतावणे यांचेकडे न राहता त्याच्या आई वडिलांसह मूळ गावी राहु लागला होता. दरम्यान दिनांक २५ डिसेंबर रोजी फिर्यादी पानतावणे हे बाहेरगावी गेल्याचे माहिती झाल्याने त्याने चोरी करण्याची योजना आखून दिवसाच फिर्यादीच्या यांच्या घरी जाऊन चोरी केली असल्याचे सांगितले. त्यावरून त्याच्याकडून नमूद घटनेतील चोरीस गेलेला मुद्देमाल पैकी एक सोन्याची चैन लॉकेट किंमत ४०४२५ , एक सोन्याची लेडीज अंगठी किंमत रुपये १३१२५ , सुई धागा लटकन कानातले एक नग किंमत ४७२५ , एक सोन्याचा वितळवलेला गडा (रवा) किंमत ४०२५० , एक जोड चांदीच्या पाय पट्ट्या किंमत ९४० रुपये असा एकूण ९९६४५ रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर संदीप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव करमलवार पोलीस हवालदार गजेंद्र चौधरी रोशन काळे नापोशी रोहन डाखोरे विपिन गायधने चालक पोहवा अमोल कुथे तसेच पोलीस नायक सतीश राठोड सायबर सेल यांनी पार पडली.