कुही :- आज दिनांक ९/७/२०२३ ला लक्ष्मी मंगल कार्यालय कुही जि.नागपुर येथे प्रा.राजकुमार घुले लेखक, कवी, (लोककलावंत) यांचा जाहीर सत्कार कालीचरण शेंडे कार्यक्रमाचे आयोजक व अन्य मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रा. राजकुमार घुले यांनी कलावंताच्या अनेक अडचणी व प्रश्न समजावून घेतले, व त्यांनी आपल्या संबोधनात कलावंताची न्याय हक्काची लढाई आपण लढू असे त्यांनी सांगितले. या पुढे विदर्भामध्ये कलावंताचे नेतृत्व कलावंतच करेल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केल्याप्रमाणे राज्यपाल नॉमिनेटिक विधान परिषद ही कलावंतालाच मिळाली पाहिजे, असे त्यांनी कलावंताच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले. कलावंतच कलावंताच्या भावना समजावून घेऊ शकतो असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. प्रा. राजकुमार घुले मागील तीस वर्षापासून सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय असून प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना त्यांनी हक्क व अधिकाराची लढाई लढून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या मेळाव्याला मान्यवर व असंख्य कलाकार उपस्थित होते.
कुही जिल्हा नागपूर येथे कलावंत मेळाव्यात प्रा. राजकुमार घुले कवी, लेखक लोककलावंत यांचा जाहीर सत्कार करण्यात आला
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com