अमरदिप बडगे
-भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू चार जण गंभीर जखमी…
संतप्त नागरीकांनी जाळला ट्रक…
-सायंकाळीं मृतदेह घेउन गावकरी पोहचले दवनीवाडा पोलिस स्टेशनला
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्याच्या महालगाव मुर्दाडा येथे अवैधरीत्या वाळू तस्करी करणारा टिप्पर ट्रॅक्टर यात विचित्र अपघात झाला आहे. अनियंत्रित टिप्परने मागेउन ट्रॅक्टर ला धडक दिली ट्रॅक्टर टीप्पर खाली घुसल्याने ट्रॅक्टरचा ड्रायव्हर जागिच ठार झाला तर उर्वरित पाच जणांना गंभीर जखमी झाले. असुन त्यांना रूग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र त्या पैकी एकाचा आणखी मृत्यू झाल्यानें मृत्कांचा आकडा 2 वर पोहचला आहे. अपघात होताच गावकऱ्यांनी टीप्परला पेटवून दिला होता. मात्र महसुल प्रशासनाच्या बेजबाबदार पणा मुळे जिल्ह्यात वाळूची अवैध चोरी होत असून या मुळे अनेक अपघात घडत आहे. त्यामुळे आधी अवैध वाळू बंद करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणुन नागरिकांनी मृतदेह दवनीवाडा पोलिस स्टेशनला आणले असून जो पर्यंत मृत्कानाच्या कुठुंबाना आर्थिक मदत दिली जात नाही तो पर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. तर या घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.