गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात १० उमेदवारांमध्ये लढत, दोन उमेदवारांची माघार

गडचिरोली :- सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 12- गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवशी मिलींद नरोटे व हरिदास बारेकर या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाकरिता आता दहा उमेदवारांमध्ये निवडणूकीची लढत होणार आहे. दरम्यान सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप देखील आज करण्यात आले आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी माहिती दिली.

हे उमेदवार आहेत रिंगणात : 

नामनिर्देश अर्ज मागे घेतल्यानंतर आता 12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे.

राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार :

अशोक महादेवराव नेते, भारतीय जनता पार्टी (कमळ),

डॉ. नामदेव दसाराम किरसान, इंडियन नॅशनल काँग्रेस (हात),

योगेश नामदेवराव गोन्नाडे, बहुजन समाज पार्टी (हत्ती).

नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : धीरज पुरूषोत्तम शेडमागे, जनसेवा गोंडवाना पार्टी (करवत), बारीकराव धर्माजी मडावी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी (शिट्टी), सुहास उमेश कुमरे,भीमसेना (ऑटोरिक्षा), हितेश पांडूरंग मडावी, वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर).

इतर उमेदवार : करण सुरेश सयाम, अपक्ष (ऊस शेतकरी), विलास शामराव कोडापे, अपक्ष(दूरदर्शन), विनोद गुरुदास मडावी, अपक्ष( अंगठी)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दोन्ही महिला पण न्याय वेग वेगळा

Sun Mar 31 , 2024
नागपुर :- भाजपच्या नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने अवैध ठरवले त्यानंतर ना त्यांची खासदारकी गेली ना त्यांना निवडणुक लढण्याकरिता अवैध ठरविले कारण अमाप पैसा आणी सत्तेच राजकारण. दुसरी कडे कांग्रेस च्या रश्मी बर्वै माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या तोंडावर जात प्रमाणपत्रा वर विरोधक आक्षेप घेताच राज्याच्या समाज कल्याण विभागाकडुन जात प्रमाणपत्र अवैध ठरविले जाते परिणामी त्यांचा उमेदवारी अर्ज बाद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com