नागपूर :-स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार (ता.१२) ४ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली झोन अंतर्गत उंटखाना येथील सहयोग हॉस्पीटल यांच्याविरुध्द स्वत: च्या व्यवसायासाठी सिमेंट काँक्रीटचा रस्ता मोठ्या अंतरावर तोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल कारवाई करून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच प्रतापनगर येथील एस. आर. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
गांधीबाग झोन अंतर्गत टेलिफोन एक्सचेंज येथील आदर्श कोचिंग क्लासेस यांच्याविरुध्द विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरात लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत इतवारी, मारवाडी चौक येथील बोन्द्रे क्लॉथ स्टोअर्स यांच्याविरुध्द प्लास्टिक पिशवी बाळगण्याबाबत कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.