सावनेर – तालुक्यातील अवघ्या १०,१२ किमी अंतरावर असलेल्या खापा रामडोंगरी व वाकोडी गावात आजुबाजूच्या परिसरात रेत माफियांनी धुडघूस घातला असून वाळू उत्खननाचा सपाटा चालविला आहे. येथून हजारो ब्रास रेती बेकायदेशीरपणे उत्खनन होऊनही महसूल कर्मचारी धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत. यामुळे वाळू चोरीला आळा बसण्याऐवजी वाळू उत्खनन व्यवसायाला अधिक गती आल्याचे दिसून येत असल्याने याला पाठबळ महसूल विभागाचे असल्याचा वाकोडी व रामडोंगरी ग्राम वासियांचा आरोप आहे.
खापा गावात वाळू चोरीचेही प्रस्थ वाढत सर्वत्र पहावयास मिळत आहे. कधी शेतातून वाळू मिश्रित मती तर कधी लिलावात घेतलेले वाळू स्टॉकच्या नवा खाली अवैध वाळू उत्खनन करण्याच्या प्रकार बेधडपणे बेकायदेशीररित्या तस्करी बिनधास्त सुरू आहे. राजरोसपणे जेसीबी, पोकलॅन्ड मशीनच्या साहाय्याने खापा कन्हान नदीतून वाळू लंपास केला जातो. हा सगळा प्रकार इतका सराईतपणे होत आहे की, कुणालाच कायद्याची किंवा कारवाईची भीती वाटत नाही. याच्या पाठीमागे काय गौडबंगाल आहे, याचं गणित सामान्य माणसाला उलगडत नाही. कमी वाळू स्टॉक विकण्यात किंवा उचलण्यात आले दाखवून स्टॉक ची मुद्दत वाढविण्यासाठी युद्धपात्री वर काम चालू आहे असे ही काळात आहे तसेच मागील काळात स्टॉक वरुन वाळू असू ही नदी पात्रातून दररोज खोदकाम करून लाखों रुपांची वाळू काढण्याच्या अनुचित प्रकाराने व शासनाला कोटी रुपयांचा चुना लावण्यात आलेला आहे.
प्रशासनाची डोळेझाक
खापा गावातील परिसरात नियमबाह्य वाळू उत्खनन होत आहे. संबंधित व्यावसायिकांनी खनिकर्म व तालुका प्रशासनाची डोळेझाक करत बेकायदेशीररित्या केलेल्या उत्खननामुळे शासनाच्या महसुलाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून याकडे कुणाचेही लक्ष नाही. प्रशासनातील संबंधित अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्यात व्यस्त आहेत. परिणामी रात्रंदिवस बेधडकपणे वाळू चे अवैध उत्खनन व अवैध वाळू वाहतूक हतूक होत असून स्थानिक जबाबदार महसूल प्रशासनाने डोळेझाक केली आहे.