संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामगार नगर येथे अवैध गांजा विक्री होत असल्याची गुप्त माहिती नवीन कामठी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांना मिळताच सापळा रचून पोलिसांनी या अवैध गांजा विक्री अड्यावर यशस्वीरीत्या कामगार नगरात एका महिलेच्या घरी धाड घालून एका लाल रंगाच्या बॅग मधून 24 हजार रुपये किमतीचा 2 किलो गांजा जप्त केल्याची कारवाही काल रात्री 10 .45 वाजता केली असून दोन आरोपीना ताब्यात घेत त्याविरुद्ध भादवी कलम 20,29 एनडीपीएस अंनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.
अटक आरोपी मध्ये मोहम्मद सोहेब मोहम्मद असलम वय 26 वर्षे रा कामगार नगर कामठी, मुजाहिद कमाल मोहम्मद ताहीर वय 38 वर्षे रा शेख बुंनकर कॉलोनी कामठी असे आहे.ही यशस्वी कारवाही पोलीस उपायुक्त श्रवण दत्त, एसीपी संतोष खांडेकर ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे ,डी बी स्कॉड चे अनिल बाळराजे, विशाल मेश्राम,सुरेंद्र शेंडे,नसीम अन्सारी, विकास उईके,कमल कनोजिया,दीप्ती मोटघरे,अश्विनी,ज्ञानेश्वर गायधने,बिसन पोटभरे,विनोद यादव यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे