तिरोडा तालुक्यात अवैध मुरूम उत्खनन सुरू शासनाचे दुर्लक्ष

अमरदिप बडगे

गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यामध्ये ग्राम नवेगाव खुर्द, येडमाकोटा, मनोरा ह्या गावामध्ये खुप जास्त प्रमाणात अवैध मुरूम उत्खनन सुरू आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे की दिवसा ढवळ्या चक्क नवेगाव येथील तलाठी कार्यालयाच्या समोरच अवैध मुरूमाचे उत्खनन सुरू असतो तरी पण संबधीत तलाठी, व मंडळ अधिकारी कोणतीच कार्यवाही करत नाही यावरून असे लक्षात येते की कुठेतरी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी मुरूम तस्करासोबत केलेल्या संगनमताने मुरूम उत्खननाचे कार्य जोरात सुरु आहे. अशी चर्चा परिसरात होत आहे. याबाबत जिल्हा खानिनकर्म अधिकारी यांच्याकडे तक्रार करून सुध्धा त्यांनी पण कोणतीच कार्यवाही केली नाही.यावरून असे लक्षात येते की कदाचित जिल्हा खानिनकर्म अधिकारी यांचा पण आशीर्वाद मुरूम तस्करावर तर नाही ना असे स्पष्ट होते?

यावर जिल्हाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी कोणती कार्यवाही करतात याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बीपीएल प्रमाणपत्राअभावी कित्येक लाभार्थी कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभापासून वंचित

Mon Jun 27 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  बीपीएल प्रमाणपत्राची अट रद्द करण्याची मागणी कामठी ता प्र 27 :- केंद्र शासनातर्फे अनेक जनकल्यानकारी योजना राबविल्या जात आहेत .त्या योजनांचा लाभसुद्धा नागरिकांना मिळत आहे परंतु काही योजनामध्ये शसनाचे निकष सर्वसामान्यावर अन्याय करणारे असल्यामुळे त्या योजनांचा लाभ मात्र गरजू व्यक्तीला मिळत नाही .दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील वय 18 ते 59 वर्षे वयोगटातील कर्ता व्यक्ती मरण पावल्यास त्याच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com