संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- ‘सद्रक्षणाय-खलनिग्रहनाय ‘हे ब्रीद बाळगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जवाबदारी असते.मात्र खाकी वर्दीतील माणूस हा मिळत असलेल्या चिरीमिरीमुळे आपल्या कर्तव्याला जेव्हा विसरतो तेव्हा पोलिसांच्या त्या ब्रीदवाक्याला गालबोट लावण्याचे काम सुद्धा हा खाकी वर्दीतील माणूस करत असतो. असाच प्रकार कामठी पोलीस स्टेशन हद्दीत निदर्शनास येत असून कामठी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत काही पोलीस दादा काही पोलीस दादा स्थानिक गुन्हेगारांना अप्रत्यक्षरित्या पाठबळ देत असल्याने परिसरात पोलिसांविषयी अभयपणा निर्माण झाला असून पोलिसांच्या आशीर्वादाने परिसरात बिनधास्तपने अवैध धंदे सुरू आहेत. तर आगामी काळात जीवघेण्या घटनेची शक्यता नाकारता येत नाही. ते फक्त पोलिसांच्या अभयपणामुळे!
कामठी पोलीस स्टेशन हद्दीत जुगार,सट्टा,अवैध दारू विक्री, चोरी,अवैध गांजा विक्री, एम डी विक्री ,गॅस रिफ्लेकटिंग आदी अवैध व्यवसाय बिनभोभाटपने फोफावले आहेत ते फक्त पोलिसांच्या आशीर्वादाने! स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादामुळे सुरू असलेले अवैध व्यावसायिकांना पोलिसांची कुठलीही भीती राहली नसून सर्वसामान्य नागरिकांना मारझोड करणे हे नित्याचेच झाले आहे. सुरू असलेल्या अवैध दारू विक्री, गांजा विक्री तसेच एम डी विक्रीमुळे तरुणाई ही नशेच्या खाईत गेले आहे.एखादा गुन्हा घडल्यास त्या गुन्ह्यात साटेलोटे करण्यासाठी स्थानिक रहिवासी पोलीस ही मोलाची भूमिका साकारत असून गावातील तोतयागिरीमुळे ‘तेरी भी चूप मेरी भी चूप ‘अशी भूमिका साकारून गुन्हेगारांवर कायद्याचे वचक ठेवण्यापेक्षा आपसी संबंधातून सामंजस्याची संबंध बाळगत गुन्हेगारांना शह देण्याचे काम करीत आहेत. तर गुन्हेगार वर्गातील लोकं हे पोलीस अपने जेब मे है,अपुनको किसका डर ‘या भाषेतून पोलिसांचा अभयपणा असल्याचे दिसुन येत आहेत. न्यायालयीन प्रक्रियेनुसार काही आरोपी वर्गातील लोकं हे कुणी पॅरोल तर कुणी जामिनावर आलेले आहेत. अशा वेळी या गुन्हेगारी लोकांच्या प्रतीक्षेत असलेले विरोधक जुन्या वैमनस्याचा वचपा काढण्याच्या बेत आखून स्थानिक पोलिसांना विश्वासात घेऊन ,चिरीमिरीच्या आधारे जीवघेणी घटना करायला घाबरणार नाही. कारण गुन्हा घडल्यावर पोलिसांची आपल्याला मदत मिळणारच या अपेक्षेने गुन्हेगारी घटना वाढीस चालना मिळत आहे.आगामी सणोत्सव तसेच आगामी निवडणुका लक्षात घेता शहरात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावे यासाठी वरिष्ठांनी पोलीस स्टेशनच्या या भ्रष्ट पोलिसांचा शोध घेऊन यांना नजरकैद करून कायदेशीर कारवाही करावी अशी मागणी येथील जागरूक नागरिक करीत आहेत.
@ फाईल फोटो