गोंडखैरी पारधी बेडा येथील अवैध्य दारू भट्टीवर छापे, ०१ लाख ८३ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त

– कळमेश्वर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची संयुक्त प्रतिबंधक कारवाई

कळमेश्वर :- कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील गोंडखैरी येथील पारडी बेडा येथे मोठया प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून तिची मोठ्या प्रमाणावर आजुबाजुचे परीसरात विक्री होत असल्याची गोपनिय खबर कळमेश्वर पोलिसांना मिळाल्याने पोलिस अधिक्षक हर्ष ए. पोहार (भा.पो.से.), अपर पोलिस अधिक्षक डॉ. संदिप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग सावनेर अजय चांदखेडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रभारी ओमप्रकाश कोकाटे यांचेसह पोलिस स्टेशन कळमेश्वरचे प्रभारी अधिकारी यशवंत सोळसे यांचे नेतृत्वाखाली दिनांक २७/११/ २०२३ रोजी पहाटे ०७.०० वा. सुमारास पोलिस स्टेशन कळमेश्वर हद्दीतील गोंडखैरी पारडी बेडा येथे सुरू असलेल्या अवैध दारू भट्टीवर छापे मारून एकुण जवळपास १८३०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून एकुण ०८ आरोपीतांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली आहे. सर्व आरोपीतांवर पोलिस स्टेशन कळमेश्वर येथे दाखल करण्यात आले असुन सदर कारवाई दरम्यान एकुण ८१०० लिटर कच्चे रसायन सड़वा किंमती १८३००० हजार रू., जप्त करण्यात आली असून दारूभट्टी साठी लागणारे इतर साहित्य ड्रम, पमेले व दारू तयार करणेकामी लागणारे साहीत्य दारूच्या भट्टया उद्धवस्त करण्यात आल्या आहे.

सदरची कारवाई नागपुर प्रमीण जिल्हयाचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, यांचे मार्गदर्शनात व उपविभागीय पोलीस अधिकारी चांदखेडे, यांचे उपस्थितीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि राजीव कर्मलवार, पोलीस उपनिरीक्षक पांडे, व २५ पोलीस अंमलदार तसेच कळमेश्वर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे, सहायक पोलीस निरीक्षक पोटभरे, मेंश्राम महीला पोलीस उपनिरीक्षक गेडाम, व २८ अंमलदार, तसेच आर सी पी पथकातील १५ अंमलदार, सावनेर विभागातील १० अंमलदार असे एकुण ७ अधिकारी व ७८ पोलीस अंमलदार मिळुन सदर कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खून प्रकरणी 3 आरोपींना अटक

Tue Nov 28 , 2023
रामटेक :- अंतर्गत मौजा गडमंदीर रोड रामटेक, दिनांक २६.११.२३ चे ०५.३० वा. ते ०६.३० वा दरम्यान, यातील फिर्यादी चा मुलगा मृतक नामे विवेक विश्वनाथ खोबागडे वय २१ वर्ष हा व त्याचा मित्र फैजान खान रा पवनी याचे सोबत त्याचे मोटर सायकल ने रामटेक येथे शोभायात्रे चा कार्यक्रम करीता आले होते, कार्यक्रम संपवुन गडमंदीर रामटेक वरुन मोटर सायकल ने डबल सिट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com