नागपूर :- बँकेने लिलाव केलेला प्लॉट दोन वर्ष लोटूनही घेणाऱ्या व्यक्तीस ताबा दिला नसल्याची खळबळ जनक बातमी समोर आली आहे. इंडियन बँक (इलाहाबाद बँक) च्या अधिकाऱ्यांनी धोखाधडी केल्याचे वृत्त समोर येत असून पिडित प्लॉट धारकाने पत्रकार समक्ष आपली व्यथा मांडली आहे.
सविस्तर वृत्त असे की एका लोकप्रिय वर्तमान पत्रात इंडियन बँक / इलाहाबाद बँकेच्या वतीने पिवळी नदी वांजरा येथील एका जागेचा ई- लिलाव करण्यासंदर्भात १० मे २०२२ रोजी निवेदा दिली होती. जरीपटका येथील रहिवाशी धिरज मोहनलाल तेजवानी यांनी इंडियन बँक / इलाहाबाद बँके कडून तो वादग्रस्त प्लॉट २ जुलै २०२२ रोजी १ कोटी अडिच लाखात घेतला होता. ६ हजार ७८१ चौरस फुट हा प्लॉट आहे. पिडित तेजवानी यांची खलासी लाईन मोहननगर येथे किराणा दुकान आहे. बँक ऑफ इंडिया येथून १ कोटीचे कर्ज घेऊन उपरोक्त प्लॉट खरेदी केला होता. तेजवानी हे १ लाख व्याज दर महिन्याला बँक ऑफ इंडिया येथे भरतात. मात्र अध्यापही इंडियन बँक / इलाहाबाद बँकेने पिडित तेजवानी यांना घराचा ताबा दिला नाही. न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा पिडित तेजवानी यांनी दिला. या घटनेमुळे तेजवानी यांना मानसिक त्रास झालेला आहे. परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. इंडियन बँक / इलाहाबाद बँकेने ताबदतोब घराचा ताबा द्यावा, अशी मागणी पिडित तेजवानी यांनी केली आहे.