आदर्श गाव योजनेत समाविष्ट गावामध्ये कृषी विभागाच्या योजना राबवा – कृषिमंत्री दादाजी भुसे

 मुंबईदि. : आदर्श गाव योजनेत सहभागी असलेल्या गावांमध्ये कृषि योजनांची अंमलबजावणी करण्याची सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी प्रशासनाला दिली.

            आदर्श गाव योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री. भुसे बोलत होते. आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव  पवारकृषि सचिव एकनाथ डवलेकृषि आयुक्त धीरजकुमारसहसचिव (जलसंधारण) सुभाष गावडेसंचालक (जलसंधारण) श्री. शिसोदेअवर सचिव (मृद व जलसंधारण) शुभांगी पोटेआदर्श गाव समितीचे कृषि उपसंचालक सुरेश भालेराव आदी यावेळी उपस्थित होते.

            कृषिमंत्री श्री. भुसे म्हणालेलोकसहभागातून ग्रामविकास ही आदर्श गाव निर्मितीची संकल्पना आहे. हिवरे बाजार सारख्या गावाने त्या माध्यमातून विकास साधला आहे. या योजनेत सहभागी इतर गावांमध्ये कृषि विषयक योजनांची सांगड घातली तर ग्रामविकासाला अधिक गती मिळेलअसे त्यांनी सांगितले.

               यावेळी श्री.पोपटराव पवार यांनी आदर्श गाव योजनेची अंमलबजावणी ही नसबंदीनशाबंदीकुऱ्हाडबंदीचराईबंदीश्रमदान या पंचसूत्रीनुसार करण्यात येत होती. त्यामध्ये आता लोटाबंदी (हागणदारीमुक्त गाव) आणि बोअरवेल बंदी यांचा समावेश करुन या सप्तसूत्रीनुसार निकष ठरवण्यात आल्याचे सांगितले.

               या योजनेतून पाणलोट क्षेत्र विकासगाव विकास (बिगर गाभा कामे)कृषि विकास कामेपर्यावरण संवर्धनमत्ता नसलेल्यांसाठी उपजीविका उपक्रमउत्पादनाची व स्वयंरोजगाराची साधने यांची निर्मितीसमूह संगठनगावातील शिक्षणआरोग्यरोजगार व विविध क्षेत्रातील क्षमता विकास यामध्ये समन्वय आदी कामे करण्यात येत असल्याची माहिती श्री.पवार यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

युवा जोड़ो अभियान से युवाओं की राजनीती मे रूचि बड़ी

Wed Jan 5 , 2022
नागपुर – आम आदमी पार्टी के विदर्भ संघठन मंत्री आकाश सपेलकर विदर्भ के सभी तहसील पर युवाओं को आम आदमी पार्टी से जोड़ युवाओ के देश युवा का राजनीती महत्व का संदेश दे रहे है. भारत देश मे जहाँ चुनाव पर वोट डालने का प्रतिशत 60 है जहाँ देश का युवा राजनीती को दलदल मनाकर चुनाव प्रक्रिया पर भरोसा नहीं […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com