मनपाद्वारे “मी आहे जलमित्र ” मोहीम, रेन वॉटर हार्वेस्टींग करण्याचे मनपाचे आवाहन

चंद्रपूर :- पावसाद्वारे मिळणारे पाणी वाचविण्यास प्रत्येक घरी रेन वॉटर हार्वेस्टींग केले जावे यासाठी मनपा प्रयत्नशील आहे.यादृष्टीने जनजागृती करण्यास प्रत्येक वार्डात स्वेच्छेने काम करणारे जलमित्र मनपाद्वारे नेमले जाणार आहेत.याकरीता नोंदणी करून रेन वॉटर हार्वेस्टींग मोहीमेत सामील होण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

चंद्रपूर मनपा क्षेत्रात आतापर्यंत १५७५ घरी रेन वॉटर हार्वेस्टींग करण्यात आले असुन हार्वेस्टींग केल्याने पाणी बचत होऊन पर्यावरण रक्षणाचे काम घडत आहे. हार्वेस्टींग करण्यास मनपातर्फे घराच्या छताच्या क्षेत्रफळानुसार ५,७ व १० हजार रुपये अनुदान दिले जाते.जलमित्र म्हणुन काम करतांना त्यांच्या वॉर्ड मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. त्यांच्या प्रयत्नांनी १०१ घरी रेन वॉटर हार्वेस्टींग केल्यास प्लॅटीनम,५१ घरी केल्यास गोल्ड व २१ घरी हार्वेस्टींग केल्यास सिल्वर श्रेणीने पुरस्कृत केले जाणार आहे.जलमित्र म्हणुन काम करावयाचे असल्यास मनपा रेन वॉटर हार्वेस्टींग कक्ष किंवा ८३२९१६९७४३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

आज प्रश्न भूजलाच्या उपलब्धतेचा नाही तर त्याच्या वारेमाप उपशाचा आहे. आधी भूजलाचा उपसा ३५ टक्के पाण्याची गरज भागवत होता तर ६५ टक्के जमिनीवर साठवलेले पाणी वापरात येत होते. आज परिस्थिती उलट आहे. भूजलच्या उपस्याद्वारे ७० टक्के तर जमिनीवर साठवलेल्या पाणीद्वारे केवळ ३० टक्के पाणी उपयोगात येते. म्हणजेच पाणी साठविण्याचे आपले प्रयत्न फार अपुरे आहेत.

सध्या सुरु असलेला पाण्याचा उपसा भविष्यातही राहिला तर पाण्याचा फार कमी साठा शिल्लक राहणार आहे.पाण्याची पातळी कमी आहे हे समजले तर पाणी वाचविण्याचे प्रयत्न न करता लगेच बोरवेल खणली जाते व त्यामुळे पाण्याची पातळी अजूनच कमी होते.मनपातर्फे बोरवेल धारकांना रेन वॉटर हार्वेस्टींग करणे अनिवार्य करण्यात आले असुन न केल्यास त्यांना दंड ठोठावण्यात येत आहे.तसेच नविन बांधकाम करण्यास परवानगी घेणाऱ्या बांधकामधारकांना रेन वॉटर हार्वेस्टींग करणे सक्तीचे आहे याकरीता त्यांना अनामत रक्कम जमा करावी लागते. तसेच विविध माध्यमातुन जनजागृती सुद्धा करण्यात येत आहे.

बोरवेल धारकांना अनिवार्य का ? – आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टींग करणे हे सर्वांनाच अनिवार्य आहे मात्र बोरवेल धारकांना ते सक्तीचे केले जात आहे कारण बोरवेलच्या माध्यमातुन अनियंत्रित पाण्याचा उपसा करण्यात येतो. पाण्याची पातळी कमी होण्याचे हे मुख्य कारण आहे. जेवढा पाण्याचा उपसा बोरवेलद्वारे केला जातो,तेवढे वा त्यापेक्षा अधिक पाणी जमिनीला परत देणे हे बोरवेल धारकांचे कर्तव्यच असल्याने त्यांना रेन वॉटर हार्वेस्टींग करणे अनिवार्य आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Vice President’s Greetings on the eve of Buddha Purnima

Thu May 4 , 2023
New Delhi :-The Vice President of India,  Jagdeep Dhankhar has greeted people on the occasion of Buddha Purnima. Following is the text of the Vice President’s Message: “I extend my warm greetings and best wishes to all on the auspicious occasion of Buddha Purnima. Buddha Purnima is a day to reflect upon the profound teachings of Gautama Buddha, who dedicated […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com