नागपूर : जिल्ह्यातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप कार्यक्रमाचे आज, 31 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, महापौर दयाशंकर तिवारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार यांच्यासह लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
झोपडपट्टीधारकांना आज होणार पट्टे वाटप
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com