संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी वृद्धाना आधारकार्ड अपडेट करावे लागत आहे.यासाठी जन्माचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला अनिवार्य करण्यात आला आहे.मात्र बहुतांश वृद्धाकडे जन्माचा दाखला नसल्याने आधार अपडेट करणे वृद्धांसाठी डोकेदुखी ठरत आहे तेव्हा आधार कार्ड अपडेटसाठी जन्म दाखल्याची अट रद्द करावी अशी मागणी कामठी पंचायत समितीचे माजी सभापती व पंचायत समिती सदस्य उमेशभाऊ रडके यांनी केली आहे.
आधार कार्ड हा महत्वाचा पुरावा मानला जातो. आता विविध शासकीय योजनांसोबत इतरही अनेक ठिकाणी आधारकार्ड गरजेचे मानले जाते.याशिवाय कोणतेही कामे होत नाहीत. बहुतांश द्धाकडे जन्माचा दाखला नसून जन्माची नोंदच नसल्याने दाखले आणावे कोठून असा प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे अनेकांचे आधारकार्ड तयार करताना बऱ्याच त्रुटी आहेत.त्यामुळे कार्डधारकाना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता आधारकार्ड मध्ये फेरबदल करताना जन्माचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला देणे आवश्यक आहे. अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात अडचण वाढली आहे. आधार कार्ड अपडेट करताना कुठे अंगठा येत नाही तर कुठे जन्माच्या पुराव्या अभावी आधार अपडेट होत नाही म्हणून आधार कार्ड अपडेट साठी वृद्धांनी वयाचा दाखला आणावा कुठुन असा प्रश्न पडला आहे.मतदान कार्ड पाठोपाठ आता आधारकार्ड हा भारतीय नागरिकत्वाचा महत्वाचा पुरावा मानला जातो तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व इतर अनेक ठिकाणी आधारकार्ड ची मागणी करण्यात येते याशिवाय शासकीय योजनेत कोणतेच काम होत नाही .सध्या ग्रामीण भागातील वृद्धाना आधार कार्ड मधील दोष दूर करण्यासाठी बऱ्याच त्रुटींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे कार्ड धारकांना कार्ड मध्ये फेरबदल करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे ही एक शोकांतिकाच मानावी लागेल.
– जुन्या नोंदीच नाहीत
-पूर्वी ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे महिलांची प्रसूती घरीच होत होती त्यावेळेस जन्माच्या नोंदीला फार महत्व दिल्या जात नव्हते.जन्माच्या नोंदी न केल्यामुळे बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांकडे जन्माचे प्रमाणपत्र नाही त्यामुळे सध्या लाभार्थ्यांची मोठी अडचण होत आहे.आधार कार्ड अपडेट करताना ज्येष्ठ नागरिकाकडे वयाचा पुरावा नसतो त्यामुळे अश्या वृद्धांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरावे अशी मागणी कामठी पंचायत समिती सदस्य उमेश रडके यांनी केली आहे.