संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- शहरातील पाटील नगरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे दरवाजे तोडुन २१ हजार रुपयांचा मुद्दे माल चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहिती नुसार मयुर प्रमोद जामदार वय २९ वर्ष रा. पाटील नगर कन्हान हा नागपुर एन एम सी येथे नऊ वर्षा पासुन काम करतो. त्याचे स्वत: चे घर पाटिल नगर कन्हान येते आहे. परंतु तो तिथे राहत नसुन त्याचा मित्र सम्राट रंगारी वय ३४ वर्ष रा. हुडको कॉलनी नागपुर हा त्यांच्या घरी राहतो आणि अधुन मधुन आपल्या घरी पाटील नगर कन्हान येथे राहतो. बुधवार (दि.१९) फेब्रुवारी ला मयुर जामदार आपल्या घरी आला आणि घरी मुक्काम करून दुस ऱ्या दिवशी गुरुवार (दि.२०) फेब्रुवारी ला मयुर सका ळी ८ वाजता घराचे कुलुप लाऊन आपल्या ड्यूटीवर नागपुर महानगरपालिका येथे निघुन गेला. बुधवार (दि.२६) फेब्रुवारी ला मयुर आपल्या घरी पाटील नगर येथे आला. तेव्हा त्याने घराचे समोरील दार उघडुन आत प्रवेश केला असता मागिल दार तुटलेले दिसले. मयुर ने घरातील सामानाची पाहनी केली असता समो रिल हॉल मधिल ४३ इंच एल.जी कंपनीची टी.व्ही किंमत अंदाजे १२,००० रु , कॅमरेचा डीव्हीआर किंमत अंदाजे ५,००० रु, एच.पी कंपनी चा सिलेंडर किमत अंदाजे १५०० रु , चांदीचे ब्रेसलेट किंमत अंदाजे २००० रु , बी एन एस एल कंपनी चे वाय फाय राउटर अंदाचे किंमत १००० रु असा एकुण २१,००० रुपया चा मुद्देमाल दिसुन आला नाही. कोणीतरी अज्ञात चोराने घराचे मागिल दार तोडुन आत प्रवेश करून २१,००० रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी मयुर जामदार यांचे तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आरोपीचा शोध घेत आहे .