भीषण अपघात, 3 जण ठार ; सभापती गंभीर जखमी

गोंदिया –  गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले यांचा काल रात्री भीषण अपघात झाला. रहांगडाले यांच्या चार चाकी आणि दुचाकीमध्ये वडेगाव सर्रा गावा जवळ भीषण अपघात झाला. चारचाकी गाडीनं दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील पिता-पुत्र आणि काका असा तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतकात हीरदेसिंग टेकाम वय 70 वर्ष (रा. मंगेझरी) संपत आहाके (वय 65 वर्ष, रा. कोडेबर्रा) प्रताप संपत आहाके (34 वर्ष, रा. कोडेबर्रा) समावेश आह. तर सभापती यात गंभीर जखमी झाले, असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

सभापती चिंतामण रहांगडाले हे आपल्या चारचाकी गाडीने सर्रा गावावरून तिरोडा येथे येत असताना भरभाव चारचाकी गाडीचे नियंत्रण सुटत रस्त्यानं जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी  गंभीर होती की, दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर एका दुचाकीस्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातानंतर गाडी रोडच्या खाली असलेल्या शेतात पलटी झाल्याने गाडी चालक सभापती चीतामन रहांगडाले गंभीर जखमी झाले आहे. त्यांना गोंदिया येथे खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्याची प्रकृती सुध्दा चिंताजनक असल्याचं समजतं आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

बगड खिडकी ते अंचलेश्र्वर गेट व रामाळा तलाव येथे मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांचा "हेरिटेज वॉक" 

Mon Feb 7 , 2022
– ”ईको-प्रो” चे बंडू धोतरे आणि सदस्यांसह केली पाहणी चंद्रपूर, ता. ०६ फेब्रु : मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी “इको प्रो” संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे व संस्थेचे सदस्य यांच्यासह बगड खिडकी ते अंचलेश्र्वर गेट व रामाळा तलाव येथे “हेरिटेज वॉक” करून चंद्रपूर शहरातील प्राचीन वारसास्थळांची सद्यस्थिती व स्वच्छतेच्या कामाची  पाहणी केली. रविवार, दि. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ८ वाजता सदर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com