– आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव
नागपूर :- देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिक्षक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतील शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. मंगळवारी (ता. ५) रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट्ट सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या हस्ते मनपा शाळेतील उत्कृष्ठ कामगिरी बजावणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
याप्रसंगी मनपाच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम, रोटरी क्लबचे अध्यक्ष शरद टावरी, पराग लष्करी, कुसुम डागा, देवराव मांडवकर प्रामुख्याने उपस्थित होते.
कर्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी म्हणाले की, शिक्षक दिन हा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. कार्यक्रमात जरी प्रातिनिधिक स्वरुपात काही निवडक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला असला तरी, सर्वच शिक्षक आमच्यासाठी वंदनीय आहेत. समाज घडविण्याचे कार्य हे शिक्षकांच्या माध्यमातून होत असते. एक उत्तम व्यक्ती घडविण्यात जितके मोलाचे योगदान शिक्षकांचे आहेत. तितकीच त्यांची ती जबाबदारी देखील आहे. शाळेचा मूळ गाभा हे शिक्षण आहे. विद्यार्थीना गुणवत्तापूर्ण शिक्षण, ज्ञान प्रदान करणे हे शिक्षकांचे कर्तव्य असल्याचेही डॉ. चौधरी म्हणाले.
यावेळी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून मनपाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच शिक्षकांचे कार्य केवळ वर्गापुरते मर्यादित नसून, विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याकरिता असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी दुर्गानगर उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सदर केले. तर शिक्षक प्रकाश कलासिया यांनी गीत सदर केले. कर्यक्रमात आदर्श शिक्षका वर्ष २०२२ व वर्ष २०२३ चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यासह सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार देखील शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. तसेच रोटरी क्लबच्यावतीने उप्रक्रमशील शिक्षक २०२२-२३ च्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधु पराड यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षणाधिकारी सुभास उपासे यांनी केले.
आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२
प्राथमिक विभाग :- दाभा उच्च प्राथमिक शाळेच्या सहा. शिक्षिका पुष्पा विनायक भोयर, वाठोडा मराठी उच्च प्राथमिक शाळेचे सहा. शिक्षक भगवान हरी परतिके, नयापुरा हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या सहा.शिक्षिका माधुरी महेश पाल, भारत नगर मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या सहा.शिक्षिका माया सुधाकर जोगे यांचा सत्कार करण्यात आला.
माध्यमिक विभाग : – शिवणगाव मराठी माध्यमिक शाळेच्या सहा.शिक्षिका अंजली संजय कावळे, सुरेंदगढ हिंदी माध्यमिक शाळेच्या सहा.शिक्षिका शबाना मोहम्मद जफर यांचा सत्कार करण्यात आला.
आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३
प्राथमिक विभाग :- नयापुरा हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या सहा.शिक्षिका मिना राधेश्याम सिंह, दुर्गानगर मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या सहा.शिक्षिका माधुरी बाबुराव शेंडे, विवेकानंद नगर हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या सहा.शिक्षिका अरूणा सुरेंद्र बेंदले यांचा सत्कार करण्यात आला.
माध्यमिक विभाग : – संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेच्या सहा.शिक्षिका कल्पना रसिक गुलालकरी, ताजाबाद उर्दु माध्यमिक शाळेच्या सहा.शिक्षिका निलोफर यास्मीन मो. अरशद, नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळेच्या सहा.शिक्षिका अल्का सुरेश वंजारी यांचा सत्कार करण्यात आला.
रोटरी क्लबच्यावतीने उप्रक्रमशील शिक्षक २०२२-२३ पुरस्कार
कार्यक्रमात सर्वश्री उमेश पवार, विष्णु जाधव, प्रतिभा लोखंडे, अनिता भोतमांगे, शारदा मिश्रा, रेणु बढेल, दिप्ती बिस्ट, दुर्गा घरडे, बबिता नायक, शुभांगी पोहरे, प्रगती सरोदे, हरीश्चंद्र बल्की, गुलाब मेश्राम, शारदा खंडाळे, शकील अख्तर, आसेफा अंजुम, सिंधु मेश्राम, फरजाना जमाल, राजकुमार बोंबेर्डे, दिपक सातपुते, सुर्यकांत मंगरुळकर, श्रीकांत गडकरी, राजकुमार कावळे, नंदा बहुरुपी, रजनी सातपुते, ममता पांडे, निकहत फातीमा हैदरी, सिमा भिडे, अशोक शेंडे, किरण लाला यांचा सत्कार करण्यात आला.