संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 7 : – येथील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाची प्राध्यापिका डॉ. किरण नामदेवराव पेठे ह्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. प्रा. डॉ किरण पेठे ह्या सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय, कामठी येथे अर्थशास्त्र विभागात त्या ११ वर्षांपासून कार्यरत असून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नागपूर विभाग उपाध्यक्षा आहेत. तसेच रयतेचा कैवारी डिजिटल शैक्षणिक दैनिकाच्या कविता विभाग प्रमुख आहेत. त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर येथील डॉ. स्वर्णलता वारके यांच्या मार्गदर्शनात “नागपूर शहरातील बाल श्रमिकांच्या समस्या”या विषयावर आपले संशोधन कार्य पूर्ण केले. यात महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य यांचे मोलाचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ स्वर्णलता वारके , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण, उपप्रचार्या डॉ. रेणू तिवारी ,ज्युनिअर कॉलेज च्या उपप्रचार्या. सुनीता भौमिक , सुपरवायझर डॉ. सुधीर अग्रवाल सहकारी डॉ. सिद्धार्थ मेश्राम , माजी प्राचार्य डॉ. महेंद्र बागडे यांना दिले आहे. तसेच त्यांच्या आई सुंदरबाई पेठे, पती दीपक तळखंडे, आणि मुलगी यशस्वी हिला दिले आहे. आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल कॉलेजसह सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.