राष्ट्रीय १७ व्या आष्टे डु मर्दानी आखाडा स्पर्धेत महाराष्ट्रला व्दितीय पुरस्कार

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी

सुवर्ण पदक प्राप्त खेडाळुला परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव. 

कन्हान (नागपुर) : – तामिळनाडु येथे झालेल्या राष्ट्रीय १७ व्या आष्टे डु मर्दानी आखाडा स्पर्धेत महाराष्ट्राने व्दितीय पुरस्कार प्राप्त केला आहे. यात परमात्मा एक दांडपट्टा मर्दानी आखाडा निमखेडाचे खेळाडु गौरव बावने, साक्षी सुर्यवंशी व उर्वशी मलेवार हयानी सुवर्ण पदक प्राप्त करित विजय मिळल्याने कन्हान परिसरातुन विजयी खेडाळुवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नुकत्याच तामिळनाडु येथे (दि.२५ व २६ ) फेब्रुवारी २०२३ ला राष्ट्रीय १७ व्या आष्टे डु मर्दानी आखाडा चाॅम्पियन शिप स्पर्धेत आष्टे डु मर्दानी आखाडा महाराष्ट्र सचिव महागुरू राजेश तलमले, नागपुर जिल्हा ग्रामिण सचिव गुरू राजु कवरे, नागपुर जिल्हा ग्रामिण गुरू व प्रशिक्षक मोहन वकलकार यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रला व्दितीय पुरस्कार बहाल झाला आहे. यात परमात्मा एक दांड पट्टा मर्दानी आखाडा निमखेडा येथिल खेळाडु १) गौरव राजेंद्र बावणे ( शिवकला ) सुवर्ण पदक, २) साक्षी राजु सुर्यवंशी ( शिवकला ) सुवर्ण पदक, ३) उर्वशी रमाकांत मलेवार ( शिवकला ) सुवर्ण पदक प्राप्त करित विजय मिळविल्याने ग्रामोन्नती प्रतिष्ठान नागपुर ग्रामिण उपाध्यक्ष दिलीप राईकवार, प्रविण गोडे, निशांत जाधव, मराठा सेवा संघ कन्हान चे शांताराम जळते, ताराचंद निंबाळकर, राकेश घोडमारे, परमात्मा एक दांड पट्टा मर्दानी आखाडा निमखेडा चे हर्षल मल्लेवार, अल्केश वकलकर, सेजल बावने, ग्रामिण पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष मोतीराम रहाटे, कमलसिह यादव, सुनिल सरोदे, गुरूकृपा मर्दानी आखाडा टेकाडी चे निलेश गाढवे, अनिकेत निमजे, निकिता बेले आदीने विजयी खेडाळु चे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच कन्हान परिसरातुन विजय खेडाळुवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा की शहराध्यक्ष बनीं मीना कळंबे

Wed Mar 1 , 2023
कन्हान :- महासभा महिला आघाड़ी संताजी ब्रिगेड तेली समाज विदर्भ सहसंघटक प्रमुख प्रतिभा खोब्रागड़े व महिला आघाड़ी नागपुर जिला अध्यक्ष कविता रेवतकर द्वारा संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा के कन्हान शहराध्यक्ष पद मीना  कळंबे की नियुक्ति की गई। कळंबे ने अपनी नियुक्ति पर संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा संस्थापक अजय धोपटे, अध्यक्ष विजय हटवार, कार्याध्यक्ष संगीता तलमले, संगठक प्रमुख गजानन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!