नागपूर :-प्रशांत आर. जम्भोलकर, पुलिस उप महानिरीक्षक, ग्रुप केन्द्र, केन्द्रीय राखीव पोलीस बल, नागपुर यांनी दिनांक 28.08.2023 रोजी नितीन गडकरी, केंन्द्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार, रामदास आठवले, राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या विभाग/कार्यालयांमध्ये रिक्त पदे आणि नव्याने निर्माण झालेल्या पदे भरण्याच्या प्रक्रियेद्वारे, निवडलेल्या उमेद्वारांना ग्रुप सेंटर नागपूर येथे आयोजित रोजगार मेळाव्यात सन्मान प्रक्रियेद्वारे नियुक्तीपत्रे देण्यात आली.
आपल्या सर्वांना माहीत आहे की, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश दिवसेंदिवस यशाच्या नवीन शिखरांना स्पर्श करत आहे. भारत सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांतर्गत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेची जाणीव करून देत आहे आणि निर्धारित लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. आज दिनांक 28.08.2023 रोजी नवी दिल्ली येथून डिजिटल माध्यमातून पंत प्रधानांच्या हस्ते रोजगार मेळाव्याच्या 8 व्या भागाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर, देशातील विविध भागांमध्ये सुमारे 51000 यशस्वी उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले, ज्यामध्ये CRPF, CISF, BSF, ITBP, SSB, AR, ब्यूरो ऑफ माइन्स अशा विविध विभागातील यशस्वी उमेदवार उपस्थित होते.
उपस्थित उमेदवारांना प्रमुख पाहुणे पी.एस. रणपिसे, भा.पु.से. पोलीस महानिरीक्षक,पश्चिम सेक्टर, मुंबई, पी.आर. जम्भोलकर, उप महानिरीक्षक समूह केंद्र सीआरपीएफ, नागपूर, आई. लोकेद्र सिंह, उप महानिरीक्षक, रेंज सीआरपीएफ नागपूर, डॉ. मनोज कुमार सिन्हा, उप महानिरीक्षक (चिकित्सा) सयुक्त अस्पताल, सीआरपीएफ नागपूर,जी.डी.पंढरीनाथ, कमाण्डेन्ट, समूह केंद्र, सीआरपीएफ, नागपूर आणि सियाम होई चिंग मेहरा, कमाण्डेन्ट 213 (महिला) बटालियन सीआरपीएफ यांनी त्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे सुपूर्द केली.