संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आयटकच्या नेतृत्वात कामठी तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी 4 डिसेंबर पासून बेमुद्दत संपावर आहेत. कामठी येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कामठी कार्यालय तसेच कामठी पंचायत समिती प्रांगणात हे आंदोलन केले जात आहे. एवढेच नव्हे तर जनप्रतिनिधिकडे आपली कैफियत मांडत आहेत. सतत 24 दिवसापासून संप सुरू असूनही शासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही .मागण्यांची पूर्तता करण्या ऐवजी प्रशासनातील अधिकारी धमकीपात्र आदेश काढून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला चिघळण्याचा प्रयत्न करीत आहे.या आदेशाची संपकरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रणाळा कामठी येथिल एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय समोर होळी केली तसेच आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्या विरुद्ध घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला.
जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होणार नाही ,तोपर्यंत संप मागे घेण्यात येणार नाही अशी ठाम भूमिका संपकरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली आहे.