सोशल मीडियावर विविध रंजक, मसालेदार पोस्ट्स आणि सुविचार टाकत आपल्या चाहत्यांना खिळवून ठेवणारे नाव म्हणजे अनुपम खेर.
खेर आपल्या ‘कू’ अकाउंटच्या माध्यमातून कामाविषयी आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक पोस्ट्स करत असतात. अशीच एक मजेदार पोस्ट त्यांनी आज केली आहे. खेर आणि त्यांची आई यांच्यातला जिव्हाळा वेळोवेळी त्यांच्या विविध पोस्ट्समधून दिसत असतो. आज त्यांनी पोस्ट केलेला व्हीडिओ अतिशय लहानसा पण इंटरेस्टिंग आहे. यात खेर यांची आई चक्क सध्या गाजत असलेल्या पुष्पा सिनेमाच्या म्युझिकवर ठेका धरते आहे. पुष्पा या नायकाची गाण्यातली गाजलेली स्टेप अतिशय समरसून त्या करताना दिसतात.
साऊथ सिनेमा इंडस्ट्रीमधील पुष्पा सिनेमाची गाणी, त्यातल्या स्टाइल्स, संवाद याने सध्या असंख्य लोकांना वेड लावले आहे. खेर यांच्या आईही याला अपवाद ठरल्या नाहीत. मिश्कील हसू आणि एकदम मनमोकळी देहबोली घेऊन त्या नाचत आहेत. रसिकांनी हा धमाल व्हीडिओ लाइक करत त्यावर मनापासून दाद देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.काही दिवसांपूर्वीच खेर आपल्या आईला घेऊन जुहूच्या हरे कृष्ण मंदिरात गेले होते. तिथे गेल्यावर आईला झालेला आनंद त्यांनी तिच्याशी संवाद साधत रसिकांसमोर ठेवला होता.