मराठमोळ्या थाटात होणार हिंदू नववर्षाचे स्वागत, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थिती

– श्री सिध्दीविनायक सेवा ट्रस्टद्वारे तात्या टोपे नगर ते लक्ष्मीनगर पर्यंत भव्य शोभायात्रा

नागपूर :- हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा. आनंदाची, अपेक्षांची, ध्येय, आकांक्षांची उंच गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा आपल्या नव्या पिढीला कळावी, त्यांच्यात या परंपरेचे बीज रूजावे व त्यांनी ही परंपरा, संस्कृती पुढे प्रवाहित करावी या उदात्त हेतूने मंगळवारी ९ एप्रिल रोजी नववर्ष अभिनंदन समारोह समितीतर्फे हिंदू नववर्ष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात येत आहे. या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची विशेष उपस्थिती असेल.

मंगळवारी ९ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता तात्या टोपे श्री गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौकापर्यंत नववर्षाच्या स्वागताची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. महाबली हनुमान हे शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण असतील. ७.३० वाजता लक्ष्मीनगर चौक येथे रामरक्षा पठण केले जाणार आहे, सकल हिंदू समुदायाच्या गौरवाचा समारंभ गुढीपाडवा, नववर्ष स्वागताचा सोहळा साजरा करण्याकरिता शहरातील महिला, पुरूष व बालगोपालांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन नववर्ष अभिनंदन समारोह समितीतर्फे करण्यात आले आहे.

मराठमोळ्या नववर्षाच्या स्वागताच्या या सोहळ्यात तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौकापर्यंत काढण्यात येणार असलेल्या शोभायात्रेत प्रभू श्रीरामाची पालखी, कलशधारी महिला, आखाडा, ढोलताशा, लेझिम पथक, प्रभू श्रीरामाचे दरबार झाकी, महाकाल झाकी, उजैन येथील डमरू आणि झांज वादन पथक, राम-सीता-लक्ष्मण यांची पालखी, महाबली हनुमान यांचा समावेश असणार आहे. आपण सर्वांनी या शोभायात्रेत सहभागी होऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदू नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन संदीप जोशी यांनी केले.

नूतनवर्ष अभिनंदन समारोह समितीचे सर्वश्री मनोज देशपांडे, गजानन निशीतकर, जयंता आदमने, शंतनू येरपुडे, कौस्तुभ खांडेकर, दर्शन पांडे, मनीष जैन, आशिष पुसदकर, अमोल वटक, अजय डागा, दिपक वानखेडे, मंगेश उपासनी, काजल बागडी, अनुसया गुन्ता, डॉ. माधुरी इंदुरकर, आनंद टोळ आदी नववर्षाच्या स्वागत समारंभासाठी परिश्रम घेत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज

Mon Apr 8 , 2024
गडचिरोली :- संपूर्ण देशात लोकसभा निवडणुक – २०२४ चा पहिला टप्यात गडचिरोली- चिमुर मतदारसंघाची निवडणूक येत्या १९ एप्रिल २०२४ रोजी आहे. त्यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक अंतर्गत आरोग्य संस्था व आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आलेल्या आहेत. गडचिरोली जिल्हा आदिवासी, नक्षलग्रस्त व अतिदुर्गम जिल्हा असून येथे सदर निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात या जिल्हयात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com